साहित्य संमेलनाच्या मंडपाचे भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 जानेवारी 2019

यवतमाळ : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी जोरात सुरू आहे. शुक्रवारी (ता. 4) दुपारी एकला स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री मदन येरावार आणि नगराध्यक्ष कांचन चौधरी यांच्या हस्ते साहित्य संमेलनाच्या मंडपाचे भूमिपूजन समता मैदानावर करण्यात आले.

45 वर्षांनंतर होणारे साहित्य संमेलन भव्यदिव्य व्हावे, यासाठी यजमान प्रयत्नरत आहेत. सोहळ्यासाठी यवतमाळनगरी हळूहळू सज्ज होत आहे. स्वागताध्यक्षांनी समता मैदानाची चारही बाजूंनी पाहणी करून समाधान व्यक्त केले. यवतमाळात 11, 12 व 13 जानेवारीला तीन दिवस साहित्यिकांची मांदियाळी राहणार आहे. या वेळी कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते, मुख्याधिकारी अनिल अढागळे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, समन्वयक अमर दिनकर, कार्यवाहद्वय प्रा. घनश्‍याम दरणे, डॉ. विवेक विश्‍वरूपे, डॉ. श्रीधर देशपांडे, नगरसेवक डॉ. अमोल देशमुख, विजय खडसे, नितीन गिरी, भानुदास राजने, कार्तिक ताजणे, कविता बोरुलकर, कीर्ती राऊत, सुषमा राऊत, संगीता कासार, साधना काळे, रीता धावतोडे, लता ठोंबरे आदींसह साहित्य रसिकांची उपस्थिती होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi sahitya sammelan