अडचणीच्या वेळी दिल्लीतील नाही, गल्लीतील बाई कामी येते..! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

यवतमाळ : 'अडचणीच्या वेळी दिल्लीची नाही, तर गल्लीतीलच बाई कामी येते. दुसरा जन्म अंबानी-अदानींच्या घरी घेण्यासाठी माझ्या नवऱ्याने आत्महत्या केली. पण माझा एकाच जन्मावर विश्‍वास आहे. त्यामुळे रडण्यापेक्षा मी लढण्याचे ठरविले आहे..' अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनाच्या प्रसंगी झालेल्या या भाषणानंतर सभामंडपात टाळ्यांचा कडकडाट झाला. हे भाषण गेले काही दिवस गाजत असलेल्या प्रभावी व्यक्तींपैकी कुणाचेही नव्हते.. ते होते वैशाली येडे यांचे..! त्यांच्या शेतकरी पतीने आत्महत्या केली होती. 

92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे शेतकरी विधवा पत्नी वैशाली यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या भाषणाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. 'माझे दु:ख नैसर्गिक नाही; या व्यवस्थेने लादलेले आहे', असे वैशाली येडे त्यांच्या भाषणात म्हणाल्या. 

नयनतारा सहगल यांना दिलेल्या आणि नंतर मागे घेतलेल्या निमंत्रणावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यात वाद सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सांस्कृतिक कार्य व भाषा मंत्री विनोद तावडे हे उपस्थित होते. संमेलन आयोजन समितीचे कार्याध्यक्ष रमाकांत कोलते यांनी श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे आभार मानले. 

नयनतारा सहगल प्रकरणाचा निषेध करण्यासाठी उपस्थितांपैकी काही महिलांनी सहगल यांचे मुखवटे घातले होते. साहित्य संमेलनाच्या सभामंडपासून सुरक्षा यंत्रणेने हे मुखवटे ताब्यात घेतले. 

Web Title: marathi sahitya sammelan 2019 inaugurated in Yavatmal