'राज्यात मराठी विषय कायद्याने बंधनकारक करा '

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

नंदुरबार - राज्यात मराठीचा अभ्यास करणे कायद्याने बंधनकारक करावे. जो विद्यार्थी मराठी विषय घेऊन दहावी-बारावी उत्तीर्ण होईल, त्यास जादा गुण देण्यात यावेत. इंग्रजीला विरोध करणे चुकीचे आहे, असे मत 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी आज येथे व्यक्त केले. 

नंदुरबार जिल्हा साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन डॉ. काळे यांनी केले. त्यानंतर "मराठी भाषा आणि आजची स्थिती' याबाबत ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, दिवसेंदिवस मराठीची स्थिती खालावत आहे. मराठी बोलण्यातही बदल होत आहे. इंग्रजी शाळांमधून शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढत आहे. मुले मराठी भाषेचा मनापासून अभ्यास करत नाहीत. त्यासाठी पहिलीपासून मराठी विषय सक्तीचा करावा. दहावी, बारावीच्या परीक्षेत आणि त्यानंतरच्या सर्व प्रवेशांसाठी मराठी भाषा घेऊन उत्तीर्ण झालेल्यास अधिकचे गुण देण्यात यावेत. त्याबाबत कायदा करावा; मात्र परराज्यातून आलेल्यांना या कायद्यात आणू नये. 

डॉ. काळे म्हणाले, ""आपल्याला जगात वावरायचे आहे. त्यामुळे इंग्रजीचे शिक्षण टाळता येणार नाही. इंग्रजी शिकूच नका, असे कोणी म्हणत असल्यास ते चुकीचे आहे. आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकवायचे आणि मराठीचा आव आणायचा ही दांभिकता आहे.'' 

Web Title: Marathi subject to mandatory state law