"मराठीची ज्ञानपीठे' विषयावर चर्चासत्र

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जुलै 2016

नागपूर - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय नागपुरात आल्यानंतर "मराठीची ज्ञानपीठे‘ या विषयावरील चर्चासत्राच्या निमित्ताने एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संविधान चौकातील वसंतराव नाईक कला व समाजविज्ञान महाविज्ञान संस्थेच्या (मॉरिस कॉलेज) सभागृहात येत्या 16 जुलैला हे चर्चासत्र होईल.

नागपूर - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय नागपुरात आल्यानंतर "मराठीची ज्ञानपीठे‘ या विषयावरील चर्चासत्राच्या निमित्ताने एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संविधान चौकातील वसंतराव नाईक कला व समाजविज्ञान महाविज्ञान संस्थेच्या (मॉरिस कॉलेज) सभागृहात येत्या 16 जुलैला हे चर्चासत्र होईल.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, पदव्युत्तर मराठी विभाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, वसंतराव नाईक कला व समाजविज्ञान संस्था आणि पीडब्ल्यूएस कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आले आहे. दिवसभर चालणाऱ्या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत व समीक्षक डॉ. वि. स. जोग असतील. विशेष म्हणजे, केवळ संमेलनकेंद्री अशी प्रतिमा तयार झालेल्या महामंडळाचा कार्यविस्तार करण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी कळविले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्या हस्ते 16 जुलैला दुपारी 12.30 वाजता चर्चासत्राचे उद्‌घाटन होईल. या वेळी डॉ. वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर आणि डॉ. भालचंद्र नेमाडे या मराठीतील चारही ज्ञानपीठ विजेत्यांचे साहित्य, कार्य, कर्तृत्व आणि वैशिष्ट्ये आदींचा वेध घेणारे हे चर्चासत्र असेल. उद्‌घाटन सोहळ्यानंतर दुपारी 1.30 वाजताच्या सत्रात वि.स. खांडेकर यांच्यावर आसाराम लोमटे आणि कुसुमाग्रजांवर डॉ. भारती सुदामे विवेचन करतील. तर, डॉ. गिरीश सपाटे, प्रा. संजय गोहने, डॉ. अनिल नितनवरे आणि डॉ. पद्मरेखा धनकर चर्चक म्हणून सहभागी होतील. दुपारी 3.30 वाजताच्या सत्रात विंदा करंदीकर यांच्यावर डॉ. अक्षयकुमार काळे आणि डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्यावर डॉ. अजय देशपांडे विवेचन करतील. डॉ. कोमल ठाकरे, डॉ. अमृता इंदूरकर, डॉ. राजेंद्र नाईकवाडे आणि डॉ. तीर्थराज कापगते चर्चक म्हणून सहभागी होतील. सायंकाळी 5 वाजता महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेत चर्चासत्राचा समारोप होईल.

Web Title: 'marathichi Dnyanpeeth' seminar