मराठमोळे सतीश खंडारे लडाखचे पोलिस महासंचालक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

सतीश खंडारे 1995 मध्ये जम्मू-काश्‍मीर कॅडरमध्ये आयपीएस अधिकारी म्हणून दाखल झाले होते. त्यांनी प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात 7 वर्षे कर्तव्य बजावले. 2005 मध्ये हिंगोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक, 2007 मध्ये पुणे येथे पोलिस महानिरीक्षक होते. त्यांनी सीआरपीएफ व सीआयएफएस या विभागातदेखील सेवा दिली आहे.

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : जम्मू काश्‍मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर जम्मू व लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली. लडाखचे पहिले पोलिस महासंचालक म्हणून धामणगावरेल्वे तालुक्‍यातील अशोकनगर येथील मराठमोळे सतीश खंडारे यांनी पदभार स्वीकारला आहे. सतीश खंडारे 1995 मध्ये देशातून 425 वी रॅंक घेऊन आयपीएस झाले आहेत. 
सतीश खंडारे 1995 मध्ये जम्मू-काश्‍मीर कॅडरमध्ये आयपीएस अधिकारी म्हणून दाखल झाले होते. त्यांनी प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात 7 वर्षे कर्तव्य बजावले. 2005 मध्ये हिंगोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक, 2007 मध्ये पुणे येथे पोलिस महानिरीक्षक होते. त्यांनी सीआरपीएफ व सीआयएफएस या विभागातदेखील सेवा दिली आहे. त्यानंतर पुन्हा जम्मू-काश्‍मीरमध्ये पोलिस महानिरीक्षक म्हणून कार्यभार सांभाळला. आता लडाखचे पहिले पोलिस महासंचालक म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. 
पत्नीसुद्धा पोलिस सेवेत 
पोलिस महासंचालक सतीश खंडारे यांच्या पत्नी पौर्णिमा गायकवाड (खंडारे) यासुद्धा पोलिस सेवेत असून त्या पुणे येथे डीसीपी म्हणून कार्यरत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathmole Satish Khandare became Director General of Police of Ladakh