अमरावती महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे नरवणे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

अमरावती - भाजपचे संजय नरवणे महापौर; तर संध्या टिकले उपमहापौरपदी निवडून आले. त्यांना ५६ मते मिळालीत. महापौरपदाच्या शर्यतीतील काँग्रेसच्या उमेदवार शोभा शिंदे  यांना फक्त पक्षाचीच १५ मते मिळाली. बसप व एमआयएमसह एका अपक्ष सदस्याने महापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली.

पंचवार्षिकमधील सभागृहाचे गठण गुरुवारी (ता. नऊ) झाले. प्रारंभी महापौर व उपमहापौरपदासाठी निवडणूक घेण्यात आली. महापौरपदासाठी भाजपकडून संजय नरवणे, काँग्रेसकडून शोभा शिंदे यांनी उमेदवारी दाखल केली. थेट निवडणुकीत काँग्रेसच्या शिंदे यांचा ४१ मतांनी पराभव झाला. बसपच्या पाच, एमआयएमच्या दहा व एका अपक्ष सदस्याने मतदानात भाग घेतला नाही. तीन सदस्य अनुपस्थित राहिले.

उपमहापौरपदासाठी भाजपकडून संध्या टिकले, काँग्रेसकडून अ. वसीम मजीद व  एमआयएमकडून अफजल हुसेन मुबारक हुसेन यांनी उमेदवारी दाखल केली. संध्या टिकले यांना ५६ मते मिळाली व त्यांना विजयी घोषित करण्यात आले. काँग्रेसच्या उमेदवारास १५ व एमआयएमच्या उमेदवारास १० मते मिळाली. या निवडणुकीतही बसप व एक अपक्ष सदस्य तटस्थ राहिलेत.

या निवडणुकीनंतर स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली. गटनेत्यांनी दिलेली नावे महापौर संजय नरवणे यांनी जाहीर केलीत. १६ सदस्यांमध्ये १३ नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे. या समितीत भाजपला नऊ, काँग्रेसला तीन, एमआयएमला दोन तर शिवसेना व बसपला प्रत्येकी एक सदस्यपद मिळाले.

Web Title: maravati municipal mayor bjp sanjay narawane