घ्या आता चंद्रपूरातील बाजारपेठा आणि चहा टपऱ्याही बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 मार्च 2020

आतापर्यंत सार्वजनिक बागा, ताडोबा, धार्मिक स्थळ, शाळा महाविद्यालय, जलतरण, व्यायामशाळा, वसतीगृह, वाचनालय, सिनेमागृह, मॉल आणि यात्रा बंद केल्या आहेत. आता शहरातील व्यापारपेठ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकांनी गर्दी करू नये, यासाठी गल्लीबोळात भाजी विक्रेत्यांची संख्या वाढावी, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

चंद्रपूर : कोरोनो संकटाच्या पार्श्वभूमीवर गोंडपिपरी, गडचांदूर नंतर आता चंद्रपूर शहरातील बाजारपेठा बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. एवढेच नव्हे तर गप्पांचे फड रंगणाऱ्या चहा टपऱ्याही बंद करण्याचा निर्णय झाला आहे. यासंदर्भात व्यापार असोसिएशनची बैठक महानगरपालिकेत झाली. त्यात जीवनावश्‍यक वस्तू सोडून सर्व दुकाने 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. या आदेशाची अवहेलना करणाऱ्यांवर पोलिस कारवाई केली जाईल, महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे यांनी निर्देश दिले.
पेट्रोल पंप, औषधी दुकान, किराणा दुकान आणि भाजीपाला विक्री केंद्र सुरू असतील.
जिल्हा प्रशासन कोरोनोची लागण होवू नये, यासाठी सर्तक आहे. विशेषत: गर्दी टाळावी, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आतापर्यंत सार्वजनिक बागा, ताडोबा, धार्मिक स्थळ, शाळा महाविद्यालय, जलतरण, व्यायामशाळा, वसतीगृह, वाचनालय, सिनेमागृह, मॉल आणि यात्रा बंद केल्या आहेत. आता शहरातील व्यापारपेठ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकांनी गर्दी करू नये, यासाठी गल्लीबोळात भाजी विक्रेत्यांची संख्या वाढावी, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

सविस्तर वाचा - कोरोनाच्या दहशतीमुळे पुण्या मुंबईतील विद्यार्थ्यांची घरवापसी, पालकांचा जिवात जीव

दरम्यान नऊ विदेशी नागरिकांना आरोग्य यंत्रणेने देखरेखी खाली ठेवले आहे. दरम्यान जिल्ह्यातील नगर पंचायत, नगर पालिका यांनाही आपल्या क्षेत्रातील बाजारपेठा बंद करण्यासंदर्भात निर्णय घेण्यास जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान कोरोनाच्या भितीने अनेक मंगल कार्यालयातील लग्नांच्या बुकींग रद्द झाल्या आहेत.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Market in Chandrapur closed due to corona