बाजारपेठ बंद

Market closed
Market closed

संग्रामपूर(बुलडाणा) ः जिल्हाधिकारी याचे आदेश धडकताच संग्रामपूर शहरात 21 मार्च चे दुपारीच बाजारपेठ बंद करण्यात आली. या साठी नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी फिरून जीवनावश्यक दुकाने सोडून पानटपरी,हाटेल्स, जनरल स्टोअर्स, कृषी केंद्र, कापड दुकाने, रेडिमेड, हार्डवेअर आदी सर्व दुकाने बंद करण्याच्या सूचना दिल्या. 
कोरोना बाबत शासन नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा म्हणून उपायोजना करताना दिसत  आहे.

यात शासन सार्वजनिक ठिकाणी ज्या मुळे लोकांची गर्दी होणार नाही. यावर स्थानिक यंत्रणेच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. याचाच भाग म्हणून 21 मार्चचे दुपारी 12 वाजताचे दरम्यान नगर पंचायत कडून बाजारपेठ बंदचे आदेश काढण्यात आले. कोरोना संदर्भात या भागात नागरिक गोधळलेल्या स्थितीत असल्याचेही चित्र आहे. 
  
बाहेरून येणाऱ्याची संख्या वाढली...
तालुक्यातून रोजगारासाठी बाहेर शहरात गेलेले कोरोनाच्या धास्तीने गावात येत आहेत. दररोज येनाऱ्याची संख्या वाढतच आहे. गावात बाहेरून येणाऱ्यांनी ग्रापंचायत किंवा आशा यांचे कडे नाव नोंदणी करावी. अशा सूचना गावागावात दवंडी मार्फत देण्यात आल्याने प्रत्येक जण सतर्क होत असल्याचेही दिसत आहे. संग्रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यासाठी दररोज येणाऱ्याची सख्या वाढतच आहे. या ठिकाणी थर्मामिटर शिवाय कुठलीच सुविधा नसल्याने ड्युटीवरील अधिकाऱ्यांना मोठा पेच निर्माण होत आहे. कारण शहरातून येणाऱ्या ची कोरोना बाबत ची तपासणी करायची म्हटली तर अकोला किंवा बुलढाणा पाठवावे लागते. बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला तपासणी साठी पाठवायचे म्हटले तर त्या ठिकाणी गर्दी वाढण्याची भीती . असा संभ्रम घेऊन वारंवार  वरिष्टाच्या सल्ल्याने येथील कार्यभार सुरू असल्याचे दिसत आहे. सोबतच बाहेरून आलेल्यानी एकदम घाबरून न जाता गावात काही दिवस एकांत राहावे असा सल्ला आरोग्य केंद्रातून दिला जात आहे. 

खाजगी वाहनांची प्रवाशी वाहतूक बंद
वरवट बकाल तेल्हारा व सोनाळा रस्त्यावर प्रवाशी वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहन धारकांनी कोरोनाच्या धर्तीवर गर्दी कमी करण्यासाठी 21 मार्च पासून प्रवाशी वाहतूक करण्याचे टाळले आहे. या दोन्ही रस्त्यावरील खाजगी वाहने पुर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय वाहन धारकांनी पोलिसांच्या विनंतीवरून घेतल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com