नाताळासाठी सजली बाजारपेठ!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 December 2019

ख्रिस्ती धर्मियांच्या पवित्र नाताळ सणाच्या पाश्र्वभूमीवर  यानिमित्त शहरातील विविध चर्चमध्ये तसेच घरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नाताळासाठी अकोल्याची बाजारपेठ सजली असून, १६० वर्षांचा इतिहास असणारी अकोल्यातील खिश्चन कॉलनीदेखील आकाशदिवे, कंदील, रेगीबेरंगी विद्युत रोषणाईने उजळून निघाली आहे. 

 

अकोला: ख्रिस्ती धर्मियांच्या पवित्र नाताळ सणाच्या पाश्र्वभूमीवर  यानिमित्त शहरातील विविध चर्चमध्ये तसेच घरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नाताळासाठी अकोल्याची बाजारपेठ सजली असून, १६० वर्षांचा इतिहास असणारी अकोल्यातील खिश्चन कॉलनीदेखील आकाशदिवे, कंदील, रेगीबेरंगी विद्युत रोषणाईने उजळून निघाली आहे. 

प्रभू येशूंचा जन्मदिवस असलेला ख्रिसमस अर्थात नाताळ हा सण मंगळवार, 25 डिसेंबर रोजी साजरा होत आहे. या सणाच्या निमित्ताने सजवले जाणारे ख्रिसमस ट्री, सान्ताक्लॉजचे कपडे, गिफ्ट याचे लहानांसोबतच मोठ्यांनाही आकर्षण असते. अजूनही पालक लहान मुलांच्या उशाला त्यांचे आवडते गिप्ट ठेवतात आणि सान्ताक्लॉजच्या आठवणीत लहान मुले रंगून जातात. नाताळ आता दोन दिवसांवर आल्याने ख्रिस्ती बांधवांच्या घराघरात सणाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. शहरातील सर्व चर्चना आणि घरांना रंगरंगोटी व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर सणासाठी बाजारपेठदेखील सजली आहे.

हेही वाचा - अवघ्या 27 वर्षीच बनला न्यायाधीश

बाजारपेठेत विविध साहित्य
शहरातील गांधीरोडवरील  बाजारपेठेत लहान मोठ्या आकाराचे ख्रिसमस ट्री, जिंगलबेल्स, चांदण्या, सांताक्लॉॅजचे शर्ट, शुभेच्छापत्रे, सांताक्लॉज टोपी, कपडे, चॉकलेटस, केकस, कॅडबरी, सजावटीचे साहित्य, रंगीबेरंगी मेणबत्या आणि डिझायनर जिंगल बेल्स दाखल झाल्या असून, त्यांच्या खरेदीसाठी ख्रिस्ती बांधवांची झुंबड उडाली असल्याचे दिसून येते. यादिवशी केकही कापले जात असल्याने बेकरीमध्ये विविध फ्लेवरमधील व वेगवेगळ्या आकारातील साधे केक, पेस्ट्री केक सजले आहेत. 

Image may contain: 2 people, night and outdoor

चर्च आणि घरेही उजळली
गेल्या आठवड्यापासूनच ख्रिस्ती लोकांच्या नाताळ सणाची तयारी सुरू झाली. ख्रिश्चन कॉलनीतील घरांना आणि चर्चला रंगरंगोटी करण्यात आली. त्यामुळे ख्रिश्चन कॉलनी सध्या प्रकाशाने उजळून निघाली आहे. या सणानिमित्त अकोल्यातील प्रमुख आठ चर्च आणि जिल्हाभरातील मिळून सर्व सुमारे 30 चर्चमधून या सणाची तयारी झाली असून, येत्या दोन जानेवारीपर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कतिक कार्यक्रमांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, 24 डिसेंबरला रात्री या सर्व चर्चमधून कॅरोल पार्टीचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये सहभागी होऊन शेकडो अबालवद्ध घरोघरी जाऊन ख्रिस्तजन्माची गीते सादर करतील. मंगळवार 25 डिसेंबरला सर्व चर्चेसमधून सकाळी ख्रिसमसनिमित्त प्रार्थनासभा होतील. त्यानंतर आठवडाभर विविध कार्यक्रमांची रेलचेल राहील. त्याचदिवशी सायंकाळी अकोल्यातून ख्रिसमसनिमित्त भव्य रॅली आयोजित करण्यात आली आहे. पुन्हा 31 डिसेंबरला रात्री कॅरोल पार्टीद्वारे घरोघरी जाऊन नवीन वर्षाच्या स्वागताची गीते सादर केली जातील. अशाप्रकारे येत्या 2 जानेवारीपर्यंत ख्रिश्चन धर्मीय नाताळ आणि नववर्षाचा आनंद साजरा करतील. 

हेही वाचा - कुटुंब नियोजनात पुरुष ‘नामानिराळे’च

नाताळसाठी जय्यत तयारी
गेल्या दोन दिवसांपासून खिश्चन कॉलनीमध्ये अबालवृद्ध एकत्र येवून खिस्तजन्माची गाणी म्हणत आहेत. विविध चर्चमधील कॅरोल पार्टी घरोघरी जावून प्रभू येशूंच्या जन्माची गीते अगदी नाचून, गाऊन सादर करीत आहेत सोबतच नाताळ व नवीन वर्षाच्या शुभेच्छाही देत आहेत. एकंदरीतच खिश्चन धर्मियांनी नाताळ सणासाठीची जय्यत तयारी केली असल्याचे दिसून येते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Market crowds for Christmas akola marathi news