विदेशातून पैसे पाठवणारा पती हुंडा कसा मागेल? - उच्‍च न्यायालय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

नागपूर - विदेशातून पत्नीला दरमहा ४९ हजार रुपये पाठविणारा पती पाच लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी कसा करू शकतो, असा प्रश्‍न उपस्थित करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पतीसह नऊ जणांवरील गुन्हे रद्द केले.

परवेज खान हा सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे नोकरी करतो. २०१२ मध्ये हीना नावाच्या तरुणीशी त्याचा विवाह झाला. लग्न झाल्यावर काही दिवसांनी तो सौदीला निघून गेला. जानेवारी २०१६ ला हीनाने पतीसह सासू, नणंद अशा नऊ लोकांविरुद्ध हुड्यांसाठी छळ करीत असल्याची तक्रार केली.

पोलिसांनी हे प्रकरण मध्यस्थी केंद्राकडे वर्ग केले. तडजोड न झाल्याने हीनाने मे २०१६ ला पुन्हा एकदा तक्रार केली. त्या आधारावर कामठी पोलिसांनी हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा सर्वांवर दाखल केला. गुन्हा रद्द करण्यासाठी परवेजसह इतर आठ जणांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. परवेज सौदीतून दरमहा ४९ हजार रुपये साळ्याच्या खात्यात जमा करीत होता.

२०१३ ते २०१५ या कालावधीत त्याने सातत्याने पैसे पाठवले. एवढेच नव्हे, तर सासरे आजारी असतानाही त्याने दीड लाख रुपये दिले होते. सासऱ्याच्या उपचारासाठी दिलेले पैसे परत मागितले म्हणून हीनाने हुंड्यासाठी छळ केल्याची खोटी तक्रार केली, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली.

हीनाला साळ्यामार्फत पाठविलेल्या लाखो रुपयांच्या पावत्याही परवेजने सादर केल्या. या आधारावर न्या. वासंती नाईक आणि न्या. स्वप्ना जोशी यांनी हीनाचे आरोप चुकीचे असल्याचे ग्राह्य धरले. एखादा पती विदेशातून पत्नीला लाखो रुपये पाठवत असताना तो पाच लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी कशी करू शकतो, असा सवाल करीत आरोप पचनी पडण्यासारखा नसल्याचे मतही न्यायालयाने नोंदविले. तसेच पती व इतरांविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हेही रद्द केले. पती व त्याच्या कुटुंबीयांतर्फे ॲड. आदिल मिर्झा यांनी बाजू मांडली.

Web Title: marriage dowry high court crime