दुर्दैवी... प्रेमासाठी सोडले पतीचे घर; मात्र, गावातील सार्वजनिक विहिरीत तरंगताना आढळला दोघांचा मृतदेह

मंगेश वणीकर
Sunday, 30 August 2020

राकेश व नीलिमा दोघेही हिंगणघाट येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. दोघांचा सुखी संसार सुरू होता. राकेश हा येथील एका खरडा फॅक्‍टरीत कामावर होता. महिनाभरापूर्वी दोघेही आपल्या मूळगावी सावंगी येथे रहायला आले होते, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, त्यांनी आत्महत्या का केली हे कोडे बनले आहे.

हिंगणघाट (जि. वर्धा) : एका युवतीचे लग्न झाले. मात्र, तिचे दुसऱ्यासोबत प्रेम असल्याने जास्त दिवस पतीसोबत राहिली नाही. दोन वर्षांपूर्वी तिने प्रियकरासोबत लग्न केले. दोघांचा सुखी संसार सुरू होता. मात्र, असे काय झाले की दोघांचेही मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आले. ही घटना हिंगणघाट तालुक्‍यातील सावंगी (हेटी) येथे घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश देवराव सावंकार (वय ३०) व नीलिमा राकेश सावंकार (वय २५) यांचे बऱ्याच वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते. दोघे लग्नही करणार होते. मात्र, कुटुंबीयांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. याच विरोधातून मुलीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या युवकाशी लावून दिले. मात्र, मुलीचे मन सासरी लागत नव्हते. तिचे दुसऱ्यावर प्रेम असल्याने नेहमी पतीसोबत खटके उडायचे.

अवश्य वाचा - वेसण तोडून बैल आला घरी आणि बळीराजाने गोठ्याकडे घेतली धाव..नक्की काय घडले?

अशात ऐकेदिवशी तिने पतीचे घर सोडून माहेर गाठले. ती माहेरी आल्याने पुन्हा राकेशच्या संपर्कात आली. त्यामुळे त्यांचे प्रेम फुलले. दोन वर्षांपूर्वी दोघांनी प्रेमविवाह केला होता. यानंतर राकेश व नीलिमा दोघेही हिंगणघाट येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. दोघांचा सुखी संसार सुरू होता. राकेश हा येथील एका खरडा फॅक्‍टरीत कामावर होता. महिनाभरापूर्वी दोघेही आपल्या मूळगावी सावंगी येथे रहायला आले होते, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, त्यांनी आत्महत्या का केली हे कोडे बनले आहे.

नीलिमाने केले दुसरे लग्न

नीलिमा व राकेशच्या प्रेमसंबंधाची माहिती घरच्यांना लागल्याने कुटुंबीयांनी विरोध दर्शवला. यामुळे दोघांच्या भेटी थांबल्या. काही दिवसांनी कुटुंबीयांनी मुलीचे लग्न खैरी येथील युवकासोबत लावून दिले. मात्र, ती पतीच्या घरी टिकली नाही. राकेशसोबत प्रेम संबंध असल्याने ती पतीला सोडून परत आली होती. पतीचे घर सोडल्यानंतर तिने राकेशसोबत लग्न केले होते.

वाचा - सावधान! सर्वात मोठ्या धरणाचे 33 दरवाजे उघडले.. इतिहासातील सर्वात मोठा पाण्याचा विसर्ग; जिल्ह्यात पुराचा धोका वाढला

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

नीलिमा व राकेश यांनी प्रेमविवाह केला होता. दोघांचा सुखी संसार सुरू होता. मात्र, या दोघांनी गावातील सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी नऊ वाजता दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणात गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समज शकले नाही.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: married couple Suicide in Wardha district