esakal | विवाहित युवकाचा सर्पदंशाने मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पेश तायडे

विवाहित युवकाचा सर्पदंशाने मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धामणा लिंगा (जि.नागपूर) :  नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील वाडी व धामणा (लिंगा) येथील तायडे कुटुंबीयांसाठी पोळयाचा दिवस दुःख व आक्रोश घेऊन आला. परिवारातील विवाहित युवक अल्पेश भाऊराव तायडे (वय 29) याचा तान्हा पोळ्याच्या दिवशी सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार वाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विजय वानखडे यांच्या सासऱ्याकडील मंडळी अमरावती महामार्गावरील धामणा (लिंगा) या गावात राहतात. कुटुंबप्रमुख भाऊराव तायडे हे महामार्गावरील एका हॉटेलमध्ये काम करतात. घरी पत्नी, विवाहित मुलगा अल्पेश, सून 2 वर्षांच्या मुलीसह राहतात. अल्पेश मिळेल ते मजुरीचे काम करून कुटुंबाला हातभार लावायचा. शुक्रवारी बैल पोळ्याला रात्रीच्या सुमारास धामणा (लिंगा) गावातील पुलाखालून तो जात असताना येथे अंधारात जलसंचय असलेल्या भागात त्याला सर्पदंश झाला. त्यामुळे त्याने घाबरून या सापाला पकडले व रागाच्या भरात अल्पेशने त्याला दगडाने ठेचून ठार केले. हा साप विषारी आहे की बिनविषारी आहे, हे दुर्लक्षित करून फेरफटका मारून एका तासानंतर गावातील नातेवाइकांकडे जाऊन त्याने घटना सांगितली. नातेवाइकांनी मात्र ही बाब गंभीरतेने घेत त्याला त्याच्या घरी नेले. त्याच्या आईला ही घटना सांगितली. यादरम्यान मात्र अल्पेशला चक्कर येऊ लागल्याने सर्व घाबरले. दुचाकीवर त्याला बसून रात्री एकच्या सुमारास शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्‍टरांनी तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. शनिवारी दुपारी वाडी टेकडी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

loading image
go to top