पतीकडून मारहाण, सासरच्या मंडळीचा शारीरिक व मानसिक त्रास; मग काय?

Married woman commits suicide in Yavatmal yavatmal crime news
Married woman commits suicide in Yavatmal yavatmal crime news

आर्णी (जि. यवतमाळ) : तालुक्यातील सुकळी येथील विवाहितेला पती मारहाण करीत होता. तर सासरची मंडळी शारीरिक व मानसिक त्रास देत होते. सासरच्या मंडळीकडून होणारा सततच्या त्रसाला कंटाळून विवाहितेने २३ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घसातच लाकडी फाट्याला साडीने गळफास लाऊन आत्महत्या केली. आरती उर्फ अर्चना शिवाजी दासरवाड (वय १९, रा. सुकळी, ता. आर्णी) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

आरतीला सासरकडील मंडळी त्रास देत होते. तर नवरा मारहाण करीत होता. त्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून तिने घरातच लाकड्याच्या फाट्याला गळफास लाऊन आत्महत्या केल्याची फिर्याद मृताचा भाऊ परमेश्वर दत्ता दिवटेवाड (वय २७, रा. सोईट, ता. उमरखेड) यांनी गुरुवारी दिली होती.

त्याच्या तक्रारीवरून नवरा शिवाजी रामराव दासरवाड (वय २५), सासरा रामराव शंकर दासरवाड (वय ६५), सासू शांता रामराव दासरवाड (वय ५५), दीर विष्णू रामराव दासरवाड (वय २०) व ननद शीतल या पाच सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. आत्महत्या प्रकरणातील नवरा शिवाजी दासरवाड, दीर विष्णू दासरवाड या दोघांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश हिरुळकर, विशाल गावंडे करीत आहे.

नातेवाईकांकडून सासरच्या मंडळीस मारहाण

फिर्यादी शिवाजी दासरवाड हा सुकळी येथे गुरुवारी सकाळी नऊ वाजता घरी असताना सासरवाडी येथून शंकर पालेवाड (वय ४०), मामा सासरा पालेवड (वय ४०) सीताराम पांडू कारलेवाड (वय ३०) सर्व रा. आंबोडा ता. महागाव जि. यवतमाळ हे आले होते. ‘आमची मुलगी अशी कशी मरण पावली’ असे म्हणत शिवीगाळ करीत काठीने मारहाण केली.

मृताचा पती शिवाजी दासरवाड यांनी आर्णी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शंकर पालेवाड (वय ४०), मामा सासरा पालेवड (वय ४०), सीताराम पांडू कारलेवाड (वय ३०) सर्व रा. आंबोडा, ता. महागाव, जि. यवतमाळ यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास जमादार संजय भारती करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com