नरसिंगपूरची विवाहिता ठरली हुंडाबळी, चिमुकल्याचाही मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

अमरावती -  दर्यापूर तालुक्‍यात नरसिंगपूर येथील विवाहिता सासरच्या जाचापायी हुंडाबळी ठरली. या घटनेत नवविवाहितेसह तिच्या चिमुकल्याचाही जळाल्याने मृत्यू झाला. दर्यापूर पोलिसांनी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

प्रवीण नामदेव बायस्कर, राजेश नामदेव बायस्कर, स्वाती राजेश बायस्कर (सर्व रा. नरसिंगपूर) असे गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. मृत महिलेच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानुसार, लग्नानंतर कौटुंबिक कारणावरून सासरच्या मंडळीकडून माझ्या मुलीचा हुंड्यासाठी तिघांनी छळ केला. त्या जाचाला कंटाळून मुलगी सारिका प्रवीण बायस्कर (वय 38) हिने जाळून घेऊन आत्महत्या केली. या घटनेत विवाहितेसह तिचा मुलगा विघ्नेश (वय 3) हासुद्धा जळाला. आईसह विघ्नेशचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. सात) ही घटना घडली. दर्यापूर पोलिसांनी प्रवीण व राजेश बायस्कर या दोघांनाही अटक करून आज, बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. 

Web Title: married woman died due to the burned

टॅग्स