विवाहितेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओ केला व्हायरल 

अनिल कांबळे
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

नागपूर : दोन युवकांनी एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार केला. शारिरीक संबंधाची अश्‍लिल चित्रफित बनविली. व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती दाखवून महिलेला अनेकांशी शारिरीक संबंध ठेवण्यास बाध्य करीत देहव्यापारात ढकलले. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. छोटेबाबा उर्फ शहनशहा शेख शरिफ शेख (वय 27, महाल किल्ला, कोतवाली) आणि बंटी उर्फ अजय अक्षय श्रीवास (वय 27, गणेशपेठ) अशी आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 20 वर्षीय महिला सुजाता (बदललेले नाव) हिचे जानेवारी 2018 मध्ये लग्न झाले. ती पतीसह गणेशपेठमध्ये राहते. मोलमजुरी करणारा पती दारूडा असून त्याची पानठेलाचालक बंटी श्रीवास याच्याशी ओळख झाली. तर बंटीचा मित्र आरोपी शहनशहा शेख सदरमधील एका टी शर्ट बनविणाऱ्या कंपनीत कामाला आहे. दोघेही दारू पिण्यासाठी सुजाताच्या घरी येत होते. तिच्या पतीचे मित्र असल्यामुळे त्यांचे जेवण आणि अन्य सुविधा ती पुरवित होती.

दरम्यान बंटीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने मित्र शहनशहा शेख यालाही सांगितले. बंटीसोबतच्या अनैतिक संबंधाबाबत पतीला सांगू का? अशी धमकी देऊन शहनशहानेही तिच्यावर बलात्कार केला. ऑक्‍टोबर महिन्यात दोघांनीही तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्याचा व्हिडीओ बनविला. तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला अन्य आंबटशौकीन मित्र आणि ग्राहकांशी शारीरिक संबंध ठेवण्यास तिला बाध्य केले. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. 

पतीला लागली कुणकुण 
घरात मित्रांसह अन्य युवक येत असल्यामुळे सुजाताच्या पतीला संशय आला. त्याने पत्नीला विश्‍वासात घेऊन विचारपूस केली. त्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला. पती दारूच्या नशेत असताना दोघांनीही बलात्कार करून व्हिडीओ काढल्याची बाब समोर आली. पतीने गणेशपेठ पोलिस ठाण्यात आरोपींविरूद्ध तक्रार दाखल केली. 

Web Title: married woman raped by 2 and video viral by them in Nagpur