Maratha Kranti Morcha: अकोटमध्ये आंदोलनस्थळी पार पडले शुभमंगल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

गांधीग्राम (जि. अकोला) - मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी "बंद'ची हाक गुरुवारी दिली असतानाच, अकोट शहरातील शिवाजी चौकात मात्र आंदोलनादरम्यानच शुभमंगल पार पडले. या विवाहाला आंदोलनकर्त्यांनीही सहकार्य केले.

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने आज "बंद' पुकारला होता. याच वेळी गांधीग्राम येथील पांडुरंग अढाव यांचा मुलगा अभिमन्यू आणि देऊळगाव येथील हरिदास गावंडे यांची कन्या तेजस्विनी यांच्या विवाहाची तिथी होती. गांधीग्रामपासून अकोटला जाण्यास निघालेल्या मंडळीच्या मनात आंदोलनामुळे धाकधूक होती. परंतु, आंदोलकांनी त्यांना न अडविता जाऊ दिले. अकोटला पोचल्यानंतर शिवाजी चौकात आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. वर व वधू पक्षाच्या मंडळींनी त्यांना विनंती केली अन्‌ आंदोलनकर्त्यांनीही सहकार्य करण्याचे मान्य केले. त्यानंतर विवाह पार पडला. या विवाहाची चर्चा दिवसभर शहरात होती.

Web Title: Martha Kranti Morcha maratha reservation agitation #MaharashtraBandh marriage