मुस्लिम बांधवांकडून मशीद मोकळी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

नागपूर - नागपूर सुधार प्रन्यासने आज पूर्व नागपुरातील मिनिमातानगरात अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केली. एका मशिदीवर कारवाईदरम्यान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी  त्यातील साहित्य काढून ढाचा नासुप्र पथकाच्या सुपूर्द केला. नासुप्र पथकाने मशिदीच्‍या ढाच्यासह १८ अनधिकृत धार्मिक स्थळे रस्त्यावरून हटविली. 

मिनिमातानगरात काल थांबविलेली कारवाई आज नासुप्रने सुरू केली. अधीक्षक अभियंता सुनील गुज्जेलवार यांच्या नेतृत्वात झालेल्या या कारवाईत मिनिमातानगरातील १८ अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्यात आली. यात पाच झोपडा परिसरातील नूर मशिदीचा समावेश आहे. मशीद पाडण्यास पथक येताच येथील ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी नासुप्रच्या पथकाला काही वेळ मागितला. नासुप्र अधिकाऱ्यांनी ट्रस्ट पदाधिकाऱ्यांना वेळ दिला. नमाज अदा केल्यानंतर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी मशिदीतील साहित्य व इतर वस्तू स्वतःच हटविल्या. त्यानंतर पथकाने जेसीबीच्या साहाय्याने मशिदीचा ढाचा पाडला.

मिनिमातानगरात आज संकटमोचन हनुमान मंदिर, साईबाबा मंदिर, गणेशमंदिर, हनुमान मंदिर, राममंदिर, हनुमान मंदिर, समाजभवनातील बुद्धविहार, जानकीनगरातील भद्रकाली मंदिर, शिवमंदिर, वाठोड्यातील स्वराज विहार कॉलनीतील हनुमान मंदिर, गोपाल कृष्ण लॉनजवळील हनुमान मंदिर, गिडोबा रोडवरील हनुमान मंदिर, नाग मंदिर बस्ती, शिव मंदिर आदी १८ धार्मिक स्थळे हटविण्यात आली. अतिक्रमण काढण्यापूर्वी मंदिरातील मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिरांचा ढाचा तोडण्यात आला.

मनपाची तीन झोनमध्ये कारवाई 
महापालिकेतर्फे आजही तीन झोनमध्ये कारवाई करण्यात आली. यात मंगळवारी, लक्ष्मीनगर व हनुमाननगर झोनचा समावेश होता. मंगळवारी व लक्ष्मीनगरात प्रत्येकी दोन तर हनुमाननगरातील चार ठिकाणी कारवाई करण्यात आली.

Web Title: masjid empty by muslim society