विवाहितेवर सामूहिक अत्याचार

File photo
File photo

अमरावती : गाडगेनगर परिसरातून घेऊन गेलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना स्वातंत्र्यदिनी गुरुवारी (ता. 15) रात्री दहाच्या सुमारास घडली. गाडगेनगर पोलिसांनी याप्रकरणी गुरुवारी (ता. 15) रात्रीच गुन्हा दाखल केला.
शुक्रवारी (ता. 16) पोलिसांनी पीडितेसमोर एका युवकास हजर करताच, तिने पायातील चप्पल काढून त्याचे श्रीमुखात लगावल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली. सुमित ढोके (वय 27) असे अटक युवकाचे नाव आहे, असे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले. पीडित महिला आपल्या दोन अपत्यांसह माहेरी राहते. ती रस्त्याने जात असताना, गाडगेनगरच्या हद्दीत गुणवंत वाडी परिसरात तिच्या मागे दोघे जण लागले. तिला नांदगावपेठ हद्दीतील एका ढाब्याजवळ शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. पीडिता रात्रीच अर्धवट वस्त्रांसह गाडगेनगर ठाण्यात पोहोचली. तिने नोंदविलेल्या तक्रारीतून पोलिसांनी प्रथम दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला. एका प्रतिष्ठानासमोर पीडित युवतीसोबत एक युवक बोलत असल्याचे तेथील प्रतिष्ठानच्या मालकानी बघितले. त्या ठिकाणी पीडितेला पोलिस घेऊन गेले. काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले, चौकशीसाठी पीडितेला
ठाण्यात बोलाविले. त्याचवेळी एका युवकाला पोलिसांनी बोलविले असता, पीडितेने अत्याचार करणाऱ्यापैकी सुमित याला ओळखले. त्याचवेळी पीडितेने त्याला चप्पल मारली. युवतीच्या सांगितल्यानुसार सुमितला अटक केली. पोलिसांनी शुक्रवारी चौकशीसाठी ठाण्यात पाच युवकांना बोलाविले होते.
पीडितेवर अत्याचार करणारा दुसरा कोण, हे वृत्त लिहिस्तोवर समजू शकले नाही.

सुमितवर चार ते पाच गुन्हे
ज्या युवकास सामूहिक अत्याचारप्रकरणी अटक केली, त्याच्याविरुद्ध जबरीचोरी व चोरीचे चार ते पाच गुन्हे दाखल आहेत, असे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com