बेलोरा विमानतळवरून लवकरच "टेक-ऑफ'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

अमरावती : बेलोरा विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून टेक-ऑफचा मार्ग सुकर झाला आहे. विमानतळाचा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी गुडगाव येथील एका खासगी कंपनीने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे (एमएडीसी) दोन विकल्प दिले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यासंदर्भात मुंबई कार्यालयात लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. त्यावरून पुढील दिशा ठरविली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

या मास्टर प्लॅनमध्ये विकासकामासाठी दिलेल्या 75 कोटींच्या निधीतून गुडगावच्या कंपनीने ओएलएस (ऑबस्टॅकल लिमीटेशन सर्फेस) सर्व्हेचे काम दिल्ली येथील एका खासगी कंपनीने पूर्ण केले आहे. या कामात विस्तारित टर्मिनल इमारत, एटीआर-72 प्रकारचे प्रवासी विमान उतरविण्यासाठी धावपट्टीची लांबी 1372 मीटरवरून 1850 मीटरपर्यंत वाढविणे, रात्रकालीन लॅण्डिंग व्यवस्था, सुधारित एटीएस टॉवर इमारत, वाहन पार्किंग व्यवस्था, विद्युत व्यवस्था आदी कामांचा समावेश आहे. यापैकी टोपोग्राफिक व माती परीक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. बेलोरा विमानतळ व विस्तारीकरणासाठी 26 फेब्रुवारी 2009 च्या शासननिर्णयानुसार महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा (एमएडीसी) विशेष उद्देश कंपनी म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानुसार विमानतळ आराखडा व भूसंपादनाची कामे हाती घेण्यात आली. दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाने 26 फेब्रुवारी 2009 चा निर्णय रद्द करून 28 फेब्रुवारी 2014 च्या निर्णयानुसार सदर जमीन भारतीय विमानपत्तन प्राधिकरणास वर्ग केली. परंतु बेलोरा विमानतळ विकास व विस्तारीकरणासाठी भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाद्वारे अहसमती दर्शविली. तथापि, 28 फेब्रुवारी 2014 चा शासननिर्णय रद्द करून शासनाने एमएडीसीला विमानतळाच्या विस्तारीकरण व विकास करण्यासाठी नियुक्त केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: master plan of belora airport is ready