माजी सैनिकांच्या नोकरीतील आरक्षणावर गदा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

अमरावती : वनरक्षक भरती प्रक्रिया पार पडली असून त्यामध्ये नोकरीतील आरक्षणानुसार प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याचा आरोप माजी सैनिकांनी केला आहे. यासंदर्भात मुख्य वनसंरक्षकांकडे तक्रार करण्यात आली.
वनरक्षक भरतीप्रक्रियेत माजी सैनिकांना 45 टक्के गुणांची अट टाकण्यात आली आहे. तीच अट सर्वसाधारण वर्गातील उमेदवारांना घालण्यात आली आहे. त्यांच्या आणि माजी सैनिकांच्या वयामध्ये 16 ते 17 वर्षांची तफावत आहे. तरीसुद्धा माजी सैनिकांकरिता अशा अटी घालण्यात आल्या, असा आरोप करण्यात आला आहे.

राज्य लोकसेवा आयोगामार्फत ज्या जागा भरल्या जातात, त्यामध्ये सुद्धा माजी सैनिकांची गुणवत्तायादी ही त्यांच्या प्रवर्गानुसार वेगळी केली जाते. म्हणजेच त्यामध्ये कुठलीही अट टाकली जात नाही. त्याचप्रमाणे शारीरिक चाचणीतसुद्धा माजी सैनिकांवर अन्याय झाल्याचा आरोपदेखील तक्रारीत करण्यात आला आहे. लेखी परीक्षेमध्ये माजी सैनिकांना दिलेली 45 टक्के गुणांची अट शिथिल करण्यात यावी, शारीरिक चाचणीत त्यांना त्यांच्या प्रवर्गानुसार वयानुसार सवलत द्यावी, पोलिस भरतीप्रमाणेच माजी सैनिकांना त्यांच्या प्रवर्गानुसारच वागणूक देण्यात यावी इत्यादी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mattress on a job reservation for ex-servicemen