कमाल, किमान तापमानात 20 अंश सेल्सिअसची तफावत

file photo
file photo

अमरावती : रात्री आणि दिवसाच्या तापमानात दोन-चार नव्हे, तर तब्बल 20 अंश सेल्सिअस तापमानाची तफावत आहे. ही तफावत जास्त असल्याने उष्णता असह्य होत आहे. यातूनच शहरातील मुख्य रस्ते दुपारच्या वेळी निर्मनुष्य दिसू लागले आहेत.
शनिवारी अमरावतीचे कमाल तापमान 46 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी 0.6 अंश सेल्सिअसने तापमान वाढले आहे. 24 तासांमध्ये तापमान वाढ सर्वाधिक 0.9 अंश सेल्सिअस चंद्रपूर येथे नोंदविली गेली. त्यापाठोपाठ 24 तासांमध्ये गोंदिया 0.8, यवतमाळ 0.7, अमरावती 0.6, गडचिरोली, वर्धा 0.4, अकोला, वर्धा येथे 0.3 तापमानात वाढ झाली. आठवड्यापासून दरदिवसाला तापमानात कमी-अधिक प्रमाणात वाढ दिसून येत आहे. दोन दिवसांपासून उष्णतेची लाट आहे. या लाटेमुळे उकाड्याचे प्रमाणही वाढलेले आहे. श्रीलंकेकडून येत असलेले वादळ तमिळनाडू किनारपट्टीवर 30 एप्रिलला धडकण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर तापमानात घट होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे.

शनिवारचे तापमान
अकोला 46.7
चंद्रपूर, ब्रह्मपुरी 46.4
अमरावती, वर्धा 46
नागपूर 45.3
यवतमाळ 45.2
वाशीम 44.6
गडचिरोली 43.6
बुलडाणा 43.3
गोंदिया 43

धामणगाव विदर्भातील सर्वांत उष्ण शहर
धामणगावरेल्वे ः तालुक्‍यात तापमानात कमालीची वाढ होत असून शनिवारी (ता. 27) तापमानाने उच्चांक गाठत 47 अंशाला पार केले आहे. त्यामुळे शनिवारला (ता. 27) विदर्भातील सर्वांत उष्णतामानाचे शहर ठरले आहे. यावर्षी एप्रिल महिन्यातच तापमान 47 अंशांवर पोहोचल्याने मे महिन्यात ते आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. तापमान वाढत चालल्याने थंड पाणी आणि थंड पेय घेण्याकडे नागरिकांची धाव आहे. लिंबू सरबत असो की उसाचा रस, फळांचा रस लोक आवर्जून पिताना दिसत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com