"कर' ठाकरे, तर "जलप्रदाय' घोडपागेंकडे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

नागपूर - महापालिकेतील दहाही विशेष समित्यांसाठी आज महापौर नंदा जिचकार यांनी नगरसेवकांच्या नावांची घोषणा केली. महापालिकेतील संख्याबळानुसार प्रत्येक समितीत भाजपचे सहा, कॉंग्रेसचे दोन तर भाजपच्या एका सदस्याला स्थान मिळाले. भाजपचेच सदस्य अधिक असल्याने त्यांचाच सभापती होणार असून, निवडणुकीची औपचारिकता पूर्ण केली जाणार आहे. 

नागपूर - महापालिकेतील दहाही विशेष समित्यांसाठी आज महापौर नंदा जिचकार यांनी नगरसेवकांच्या नावांची घोषणा केली. महापालिकेतील संख्याबळानुसार प्रत्येक समितीत भाजपचे सहा, कॉंग्रेसचे दोन तर भाजपच्या एका सदस्याला स्थान मिळाले. भाजपचेच सदस्य अधिक असल्याने त्यांचाच सभापती होणार असून, निवडणुकीची औपचारिकता पूर्ण केली जाणार आहे. 

महापालिका सभागृहात आज सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी भाजपकडून दहा समित्यांसाठी 60, विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी 20, तर बसपचे गटनेते मोहम्मद जमाल यांनी दहा सदस्यांच्या नावाचा लिफाफा महापौरांना दिला. त्यामुळे दहा समित्यांमध्ये 90 नगरसेवकांची वर्णी लागली. महापौर नंदा जिचकार यांनी समितीनिहाय नावांची घोषणा केली. महापालिकेच्या उत्पन्नासाठी पाठीचा कणा असलेल्या कर आकारणी व कर संकलन समितीची जबाबदारी अनुभवी अविनाश ठाकरे यांना देण्यात आली. यशश्री नंदनवार या समितीच्या उपसभापती आहेत. महत्त्वाच्या जलप्रदाय विभागाच्या सभापतिपदी राजेश घोडपागे, यांची तर उपसभापतिपदी महेंद्र धनविजय यांचे नाव निश्‍चित करण्यात आले. याशिवाय आरोग्य समिती सभापती मनोज चाफले, उपसभापती प्रमोद कौरती, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, अग्निशमन व विद्युत समिती सभापती ऍड. संजय बालपांडे, उपसभापती प्रमोद चिखले, शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, उपसभापती स्नेहल बिहारे, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापतिपदी संजय बंगाले व उपसभापती अभय गोटेकर यांची नावे निश्‍चित करण्यात आली. दरम्यान, कॉंग्रेसने स्थायी समितीच्या तीन सदस्यांची नावे महापौरांना दिली. मनोज सांगोळे, हरीश ग्वालवंशी व सय्यदा बेगम अन्सारी यांच्या नावाची घोषणा महापौरांनी केली. 

तीन समित्यांचे नेतृत्व नगरसेविकांकडे 
महापालिकेत नगरसेविका मोठ्या संख्येने निवडून आल्यात. मात्र, दहा समित्यांपैकी केवळ तीन समित्यांचे नेतृत्व त्यांच्याकडे देण्यात आले. महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी वर्षा ठाकरे, उपसभापतिपदी श्रद्धा पाठक, गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समिती सभापती चेतना टांक, उपसभापती वंदना यंगटवार, विधी समिती सभापतिपदी ऍड. मीनाक्षी तेलगोटे, उपसभापतिपदी विशाखा मोहोड यांची निवड निश्‍चित आहे. 

प्रभाग 22 वर विशेष प्रेम 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या प्रभाग 22 मधील चारही नगरसेवकांची सभापती व उपसभापतिपदी निवड केली आहे. या प्रभागातील राजेश घोडपागे व मनोज चाफले यांच्याकडे अनुक्रमे जलप्रदाय व आरोग्य समितीची जबाबदारी देण्यात आली. नगरसेविका श्रद्धा पाठक व वंदना यंगटवार यांना अनुक्रमे महिला व बालकल्याण व गलिच्छ वस्ती समितीचे उपसभापतिपद देण्यात आले. 

भूषण शिंगणे पुन्हा "नासुप्र'वर
नगरसेवकांमधून नागपूर सुधार प्रन्यासवर एका नगरसेवकांची निवड करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सभेपुढे मांडला. त्यानुसार सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी भूषण शिंगणे यांचे नाव महापौरांकडे दिले. महापौरांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. भूषण शिंगणे मागील कार्यकाळातही नासुप्रचे विश्‍वस्त होते. त्यांना पक्षाने नासुप्रवर पुन्हा संधी दिली. 

Web Title: Mayor announced the names of corporators