esakal | महापौरांना कामाची मोकळीक
sakal

बोलून बातमी शोधा

महापौरांना कामाची मोकळीक

महापौरांना कामाची मोकळीक

sakal_logo
By
नीलेश डोये
नागपूर : सरकारने महापौर, उपमहापौरांचा कार्यकाळ तीन महिन्यांसाठी वाढविण्याचे आदेश काढले असून, त्यात पदाधिकाऱ्यांना बिनधास्त कामे करण्याची अनिर्बंध मोकळीक दिली आहे. एवढेच नव्हे, तर यादरम्यान झालेल्या कामांचा जाबही विचारला जाणार नाही. न्यायालयात आव्हानसुद्धा देता येणार नाही. तसा आदेशातच स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
महापौर, उपमहापौर यांच्या कार्यकाळाला मुदतवाढ देण्याचा अध्यादेश राज्य सरकारने 22 ऑगस्ट रोजी काढला. ऑक्‍टोबर महिन्यात विधानसभेकरिता निवडणूक होणार आहे. यात अधिकारी, कर्मचारी व्यस्त राहतील. कर्मचाऱ्यांवरील ताण आणि कायदा सुव्यवस्थेता प्रश्‍न, नागरिकांची गैरसोय होता कामा नये, म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यमान अनेक महापौर आणि उपमहापौरांना फायदा होणार आहे. सरकारचा हा निर्णय सत्ताधाऱ्यांच्या सोयीचा असल्याची टीका होत आहे. विरोधी पक्षाकडून आधीच यावर आक्षेप नोंदविण्यात आला आहे.
loading image
go to top