'ब्रेक के बाद' पुन्हा महिला राज

Women
Women

अकोला : महापौर पदाचे आरक्षण बुधवारी जाहीर करण्यात आले. अकोला महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला राखीव झाले आहे. त्यामुळे अडीच वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा भाजपच्या महिला नगरसेविका महापौरपदी विराजमान होणार आहे. पाचव्यांदा अकोला महापालिकेत महिला राज येत आहे.

अकोला महापालिकेची स्थापना झाल्यानंतर 2002 मध्ये पहिल्या महापौर होण्याचा मान भाजपच्या सुमनताई गावंडे यांना मिळाला होता. दुसऱ्या महापौरही भाजपच्या महिला सदस्य अश्विनी हातवळणे झाल्या होत्या. त्यानंतर पाच वर्ष काँग्रेसची सत्ता होती. सन 2014 मध्ये अनुसुचित जातीसाठी महापौर राखीव झाल्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्यावर भारिप-बमसंच्या ज्योत्सना गवई तिसऱ्या महिला महापौर झाल्या होत्या. 

अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजपने अकोला महापालिकेत सत्ता स्थान केली. त्यावेळीही महापौरपद महिला राखीव झाल्याने उज्ज्वला देशमुख यांना संधी मिळाली.  सन 2017 मध्ये भाजपने अकोला महापालिकेत 48 नगरसेवकांसह पूर्ण सत्ता मिळविली. विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन केली. आता पुन्हा अडीच वर्षांच्या ब्रेकनंतर भाजपच्या महिला नगरसेविकेच्या हाता महापालिकेची सत्ता येणार आहे.

आठव्या महापौरासाठी भाजपमध्ये स्पर्धा
अकोला महापालिकेच्या आठव्या महापौर कोण होणार याबाबत उत्सुक्ता आहे. भाजपतर्फे 24 महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत. भाजपच्या सभागृह नेत्याही महिला आहेत. पहिल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात उपमहापौरपद वैशालीताई शेळके यांच्याकडे सोपविण्यात आले होते. आता उर्वरित महिला सदस्यांपैकी कुणाची वर्णी महापौरपदावर लागणार याबाबत उत्सुक्तता असून, भाजपमध्ये हे पद मिळविण्यासाठी चांगलीच स्पर्धा दिसून येत आहे.

पक्षश्रेष्ठींचा निर्णयाकडे लक्ष
भाजपचे जिल्ह्यातील पक्ष श्रेष्ठी कुणाच्या हाता महापालिकेची दोरी सोपवितात याकडे भाजपच्या महिला नगरसेविकांचे लक्ष लागले आहे. विद्यमान महापौर विजय अग्रवाल यांचे वारसदार होण्याचा मान कुणाला मिळतो हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

विभागीय आयुक्त ठरवतील निवडणुकीचा कार्यक्रम
अकोला महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला सदस्यासाठी राखीव झाले. आरक्षणाचा टप्पा पार केल्यानंतर आता महापौर निवडीसाठीचा कार्यक्रम विभागीय आयुक्त येत्या आठवड्यात देण्याची शक्यता आहे.

आतापर्यंतचे महापौर व त्यांचा कार्यकाळ
सुमनताई गावंडे       - भाजप –      06 मार्च 2002 ते  18 फेब्रुवारी 2005
अश्विनी हातवळणे   -भाजप -       18 फेब्रुवारी 2005 ते 5 मार्च 2007
मदन भरगड           - काँग्रेस –      6 मार्च 2007 ते 3 डिसेंबर 2009
सुरेश पाटील           - काँग्रेस –      4 डिसेंबर 2009 ते 24 आॅक्टोबर 2011
ज्योत्सना गवई-      भारिप-बमसं – 6 मार्च 2012 ते 9 सप्टेंबर 2014
उज्ज्वला देशमुख      -भाजप -     10 सप्टेंबर ते 8 मार्च 2017
विजय अग्रवाल         -भाजप -     9 मार्च 2017 ते आजपर्यंत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com