महापौरांनी मागितली उमेदवारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

नागपूर : मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने शहरात सहाही जागा जिंकल्या. परंतु यात एकही महिला आमदार नसल्याने महापौर नंदा जिचकार यांनी नेमका हाच धागा पकडत पक्षाकडे येत्या विधानसभा निवडणुकीत संधी देण्याची मागणी केली आहे.

नागपूर : मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने शहरात सहाही जागा जिंकल्या. परंतु यात एकही महिला आमदार नसल्याने महापौर नंदा जिचकार यांनी नेमका हाच धागा पकडत पक्षाकडे येत्या विधानसभा निवडणुकीत संधी देण्याची मागणी केली आहे.
पक्षाने दिलेल्या महापौरपदाच्या जबाबदारीमुळे महापालिकेच्या माध्यमातून विविध नावीन्यपूर्ण प्रकल्प राबवून सामान्य जनता आणि पक्षाकरिता भरपूर सकारात्मक कार्य केले. शहराला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख निर्माण करून देण्याकरिता सतत कार्यरत असल्याचे महापौरांनी पक्षाकडे दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. मागील निवडणुकीमध्ये विदर्भातून एकही महिला उमेदवार नव्हती. हे लक्षात घेऊन योग्य त्या मतदार संघातून उमेदवारी द्यावी, अशी विनंती त्यांनी पक्षाकडे केली आहे. त्यामुळे नेमक्‍या कुठल्या मतदार संघातून त्या उत्सुक आहेत, याबाबत काहीही स्पष्ट नाही. संधी दिल्यास पुढेसुद्धा धोरणात्मक कार्याच्या माध्यमातून सामाजिक विकास व पक्षाला आणखी मजबूत करण्याकरिता आणखी चांगले कार्य करता येईल, अशी पुस्तीही त्यांनी पत्रात जोडली आहे. पुढील निवडणुकीतही विदर्भ पक्षाला भक्कमपणे साथ देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The mayor sought the nomination