एमबीबीएस प्रवेशाच्या आमिषाने  डॉक्‍टरची 36 लाखांनी फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

नागपूर - एमबीबीएस प्रवेशपूर्व परीक्षेत मुलाला कमी गुण असतानाही नाशिकच्या एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊन देण्याचे आमिष दाखवत नागपूरच्या चार आरोपींनी धुळेच्या एका डॉक्‍टर पित्याची 36 लाख रुपयांनी फसवणूक केली.

नागपूर - एमबीबीएस प्रवेशपूर्व परीक्षेत मुलाला कमी गुण असतानाही नाशिकच्या एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊन देण्याचे आमिष दाखवत नागपूरच्या चार आरोपींनी धुळेच्या एका डॉक्‍टर पित्याची 36 लाख रुपयांनी फसवणूक केली.

या प्रकरणात पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रॉबीन सहदेव मेश्राम (पाटणकर चौक), चेतन दुलीचंद जांभुळकर (साउथगंज रोड, विश्वकर्मानगर), स्नेहल पवार (नाशिक), दिलीप यशवंत चौबळ असे आरोपींची नावे आहेत. तर डॉ. महेंद्र भाऊराव कैकाडे (51, रा. विखरण, ता. सिंदखेडा, जि. धुळे, जि. पालघर) असे फसवणूक झालेल्या डॉक्‍टरचे नाव आहे. डॉक्‍टरचा मुलगा बारावीत उत्तीर्ण झाल्यावर त्याला एमबीबीएस प्रवेशपूर्व परीक्षेत कमी गुण मिळाले होते. परंतु मुलाने एमबीबीएस प्रवेशाचाच हट्ट धरला. डॉक्‍टरची भेट नागपूरच्या बंडू देव्हारे यांच्यासोबत झाली. त्याने 35 लाख रुपयांमध्ये नाशिकच्या खासगी वैद्याकीय महाविद्यालयात व्यवस्थापन कोट्‌यातून प्रवेशाचे आमिष दाखवले. विश्वास संपादन करण्यासाठी काही मुलांचे प्रवेश केल्याचा देखावा निर्माण केला गेला. 

डॉक्‍टरला विश्वास होताच त्याने मुलाच्या भविष्याच्या दृष्टीने प्रथम 30 लाख रुपये रोख आणि त्यानंतर वेळोवेळी 1.60 लाख रुपये आरोपींना दिले. काही दिवस डॉक्‍टरला प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याचे भासवण्यात आले. परंतु शेवटी मुलाला प्रवेश मिळाला नसल्याचे बघत डॉक्‍टरला त्याची फसवणूक झाल्याचे कळले. त्यामुळे त्याने आरोपींना पैसे परत मागण्याचा तगादा लावला. त्याला दोन वेळा चार लाख व एक वेळा एक लाख असे पाच लाख परत मिळाले. परंतु त्यानंतर आरोपींकडून टाळाटाळ सुरू झाली. शेवटी पैसे मिळत नसल्याचे बघत त्याने प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारींकडे याचिका दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानंतर पाचपावली पोलिसांनी चारही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला. 

Web Title: MBBS admission doctor has cheated 36 lakhs