एमडी पावडर तस्करांना अटक 

MD powder smugglers arrested
MD powder smugglers arrested

नागपूर - गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने सोमवारी दुपारी नागपूर रेल्वेस्थानकाबाहेर सापळा रचून एमडी पावडर या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली. कामराम अन्सारी अशपाक अन्सारी (25, रा. मोमीनपुरा, हाफीस बेकरी मागे) व मोहंमद शहजाद ऊर्फ साहील मोहंमद जावेद (27, रा. अहबाब कॉलनी, मानकापूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. 

सध्या शहरात तरुणाईकडून नशेसाठी एमडी पावडरचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात आहे. यामुळे तस्करही सरसावले आहेत. दोन तस्कर विक्रीसाठी रेल्वेतून एमडी पावडर घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सोमवारी दुपारी रेल्वेस्थानक परिसरात सापळा रचण्यात आला. दुपारी दोन वाजताच्या सुमारास हटिया एक्‍स्प्रेस नागपूर रेल्वेस्थानकावर थांबताच साध्या वेशातील पोलिसांनी आरोपींवर पाळत ठेवणे सुरू केले. माहिती मिळालेल्या वर्णनाचे दोन व्यक्तीसुद्धा नागपूर स्थानकावर उतरले. त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याने पोलिस बारकाईने त्यांचे निरीक्षण करीत होते. 

दोघेही रेल्वेस्थानकाच्या बाहेर पडताच पोलिसांनी झडप घालून ताब्यात घेतले. पंचासमक्ष अंगझडती घेतली असता दोघांजवळही एमडी पावडर आढळली. कामरामकडून 77 हजार रुपये किमीची मिलिग्रॅम तर साहिलकडून 82 हजार रुपये किमतीचे 360 मिलिग्रॅम एमडी पावडर हस्तगत करण्यात आले. साहिलकडे तब्बल 40 हजार रुपये किमतीचा मोबाईलही आढळला. दोघांकडून एकूण दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध सीताबर्डी ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. 

चरस बाळगणारी महिला जेरबंद 
अमली पदार्थविरोधी पथकाने शनिवारी सायंकाळी कोतवाली हद्दीतील उधोजी रोड, महाल परिसरात सापळा रचून परिसरात राहणाऱ्या चांदबानो मोहंमद हाताम (52) हिला अटक केली. तिच्याकडून सहा हजार 600 रुपये किमतीचा एकूण 66 ग्रॅम गांजा हस्तगत केला असून, कोतवाली ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com