हीच ती वेळ; मेडिकलच्या विस्ताराची!

शुभम बायस्कार
बुधवार, 18 डिसेंबर 2019

एमसीआयने घालून दिलेल्या नियमानूसार येथील मेडिलक कॉलेजच्या इमारतीचे स्वरुप नाही. सर्वच विभागाच्या वेगवेगळ्या इमारती आहेत. त्यामुळे समन्वयाचा मोठा अभाव प्रशासनामोर निर्माण होत आहे. पर्यायाने अपूऱ्या जागेत असणाऱ्या या रुग्णालयाच्या पसऱ्यामुळे रुग्णांची चांगलीच वाताहत होत असल्याने शहराच्या बाहेर सुमारे100 एकर जागेत मेडिलक कॉलेज व रुग्णालयाचा विस्तार झाल्यास वऱ्हाडातील रुग्णांना त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकर सांगतात. त्यामुळे ‘महाविकास’ आघाडीच्या सरकारने अकोल्याकडे लक्ष देण्याची ‘हीच ती वेळ’ आहे.

अकोला : एमसीआयने घालून दिलेल्या नियमानूसार येथील मेडिलक कॉलेजच्या इमारतीचे स्वरुप नाही. सर्वच विभागाच्या वेगवेगळ्या इमारती आहेत. त्यामुळे समन्वयाचा मोठा अभाव प्रशासनामोर निर्माण होत आहे. पर्यायाने अपूऱ्या जागेत असणाऱ्या या रुग्णालयाच्या पसऱ्यामुळे रुग्णांची चांगलीच वाताहत होत असल्याने शहराच्या बाहेर सुमारे100 एकर जागेत मेडिलक कॉलेज व रुग्णालयाचा विस्तार झाल्यास वऱ्हाडातील रुग्णांना त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकर सांगतात. त्यामुळे ‘महाविकास’ आघाडीच्या सरकारने अकोल्याकडे लक्ष देण्याची ‘हीच ती वेळ’ आहे.
 
वऱ्हाडातील अकोला शहर आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आपला लौकीक पसरवित आहे. तो आपल्या ‘वैद्यकीय क्षेत्रातील’ कार्यामुळे. राज्यातील अनेक रुग्ण येथे उपचारासाठी येतात. अतिशय स्वस्तात त्यांना उपचारही मिळत आहे. आता अशा शहराकडे राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष करून चालणार नाही. ‘मेडिकल हब’ म्हणून अकोल्याला विकसीत करण्याची गरज आहे. तत्पूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्याची आवश्‍यकता आहे. 2002  साली सर्वोपचार रुग्णालय हे मेडिलक कॉलेजला हस्तांतरित करण्यात आले. अशोक वाटिका मार्गांवर असणारे हे कॉलेज 21 एकरच्या परिसरात आहे. मात्र एमसीआयच्या नियमानूसार मेडिकल कॉलेज कमीत कमी 50  एकर जागेत असायला हवे.
 

हेही वाचा - युवा महोत्सवात थिरकली तरूणाई

म्हणून कॉलेज ठरतेय अपवाद 
 पूर्वीचे सामान्य रुग्णालयामध्ये प्रत्येक विभागाची स्वतंत्र इमारत अद्यापही कायम आहे. विकासाच्या दृष्टीने इमारतींची उंची वाढविण्याचा विचार जरी झाला तरी जवळच कारागृहाचा परिसर असल्याने ते होऊ शकत नाही. सर्जरी, मेडिसीन, गायनॉकॉलॉजी, आर्थो, बलारोग आदी विभागाशी समन्वय साधताना प्रशासनाला अडचणी निर्माण होतात. सिटीस्कॅन, सोनोग्रॉफी, एक्सरे काढण्यासाठी रुग्णांची मोठी धावपळ होते. त्यामुळे रुग्णांसह डॉक्टरांची चांगलीच कसरत होते. नियमानूसार कॉलेज, हॉस्पिटलची इमारत एक असायला हवी, जेणेकरून रुग्णांची भटकंती व्हायला नको. समन्वय साधता यावा. मात्र अकोला मेडिलक कॉलेज त्याला अपवाद ठरल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

हेही वाचा - अकोल्यात सकाळी धुक्याची चादर

मुलभूत सोई-सुविधांचा अभाव
रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना सुविधा देण्यास प्रशासन कमी पडत आहे, ही वास्तविकता असली तरी डॉक्टरांचीही तिच स्थिती आहे. निवासी डॉक्टर, नर्स यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांकरीता पुरेशा प्रमाणात मेडिलकमध्ये प्रसाधनगृहाची सोय नाही. त्यामुळे निवासी डॉक्टरांना कर्तव्यावर असताना वसतीगृहा गाठावे लागते. तर उच्चपदस्थ अधिकारी कॉलेजमध्ये आले तर त्यांना अधिष्ठातांच्या कार्यालयात न्यावे लागते, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांच्याही संदर्भात हीच स्थिती आहे.

हेही वाचा - सीईओंच्या वेतनाला ‘ब्रेक’ लावणाऱ्या शिक्षकाची सेवा समाप्त

क्रिडांगण, उद्यानही नाही
मेडिकलचा व्याप वाढत आहे. दररोज २ हजार रुग्ण येथे येतात. रुग्णांना सेवा देण्यासाठी रात्रदिन येथील डॉक्टर, प्राध्यापक, आंतरासिता विद्यार्थी, कर्मचारी परीश्रम घेत आहेत. कामातून निर्माण होणार हा ताण भावी डॉक्टरांना व विद्यार्थ्यांना दूर करता यावा यासाठी एमसीआयच्या नियमानूसार मेडिकल कॉलेजमध्ये क्रिडांगण, खेळाचे साहित्य, उद्यान व इतर सुविधा असणे महत्वाचे आहे. मात्र या सुविधा येथे नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून यापासून वंचित राहावे लागत आहे.

हेही वाचा - अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी

नागपूरच्या धर्तीवर विकासाची गरज
यवतमाळ, नांदेड, धुळे, अंबेजोगाई येथील कॉलेज, रुग्णालयाला स्वतंत्र इमारती झाल्यात. नागपूर येथील मेडिलक कॉलेज सुमारे 200 एकरच्या विस्तीर्ण परिसरात आहे. त्याच धर्तीवर शहरबाहेर सुमारे 100  एकरच्या परिसरात कॉलेजचा विस्तार केल्यास येथून चांगले डॉक्टर निर्माण होऊ शकतील. रुग्णसेवेचाही दर्जा सुधारण्यास मदत होईल.

तर समन्वयाचा प्रश्‍न उद्भवेल
काही दिवसांपूर्वी कॉलेजचे स्ट्रक्चरल आॅडीट झाले. त्यामध्ये येथील काही इमारतींचे पाडकाम करून येथे नवीन निर्माण करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु असल्याचे समजते. वेगवेगळ्या भागात वेगवेगळे विभाग नव्याने तयार होतील. त्यामुळे समन्वय साधताना प्रशासन-विद्यार्थी-रुग्णांची चांगलीत वाताहत होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medical college needs expansion