वैद्यकीय महाविद्यालये कधी होतील "सुपर'? 

वैद्यकीय महाविद्यालये कधी होतील "सुपर'? 

नागपूर - उपराजधानी दोन दशकांपासून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल रिसर्च सेंटरपासून दूर होते. "हृदय', "सीव्हीटीएस', नेफ्रोलॉजी आणि न्यूरोलॉजीचे उपचारापुरते मर्यादित होते. परंतु, सुपरमध्ये दोन विषयांत डीएम अभ्यासक्रम सुरू झाले आणि संशोधन संस्थेचा दर्जा मिळण्याचे संकेत मिळाले. यापुढील टप्पा म्हणजे विदर्भातील अकोला आणि यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही सुपर स्पेशालिटी तयार करण्याची घोषणा 2 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. परंतु, ती घोषणा फोल ठरली. अद्यापही अकोला येथील 238 खाटांचे तर यवतमाळ येथील 210 खाटांचे सुपर स्पेशालिटी कागदावर आहेत. 

सध्या अकोला, वाशीम, बुलडाणा, खामगावपासून यवतमाळ, वणी, अमरावती परिसरातील 50 टक्के रुग्ण मेडिकल आणि सुपर  स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येतात. अकोला आणि यवतमाळ येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तयार झाल्यास मेडिकल आणि सुपर स्पेशालिटीवरचा भार मोठ्या प्रमाणात कमी होईल. अकोला-यवतमाळ येथे सुपर स्पेशालिटी तयार करण्याचे संकेत मिळाल्यानंतर वरिष्ठ डॉक्‍टरांशी चर्चा केली असता, नागपूरच्या सुपर स्पेशालिटीसारखी स्थिती होणार असल्याची चर्चा वरिष्ठ डॉक्‍टरांमध्ये होती.

अकोला, यवतमाळ येथील "सुपर'ला प्रथम शैक्षणिक दर्जा मिळाला, तर उपचाराचा दर्जा आपोआपच वाढेल. परंतु, संशोधनापूर्वी थेट उपचारासाठी सुपर स्पेशालिटी सुरू झाल्यास पाहिजे तो परिणाम मिळणार नसल्याचे तज्ज्ञ सांगत होते. नेमकी हीच अवस्था अलीकडे अकोला मेडिकल कॉलेजमध्ये दिसून येत आहे. यवतमाळ येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचाराचा दर्जा वाढत आहे. नवनवीन उपक्रम विद्यमान अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवर राबवीत आहे. यावर्षी प्रथमच फवारणीमुळे होणाऱ्या विषबाधित रुग्णांवर योग्य उपचार झाले. यामुळे अधिष्ठाता डॉ. श्रीगिरीवारांचे यश मान्य केले जाते. परंतु, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तयार झाल्यास याचा अधिक लाभ होईल. प्रारंभी अकोला आणि यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटीत हृदयरोग, सीव्हीटीएस, नेफ्रोलॉजी, युरोलॉजी, न्यूरोलॉजी हे विभाग तयार होणार होते, या संदर्भात वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. 

विदर्भासाठी ठरणार वरदान 
नागपूरच्या सुपर स्पेशालिटीत सध्या विदर्भासह मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड येथून सुमारे 30 टक्के रुग्ण उपचारासाठी येतात. अमरावतीमध्ये सुपर स्पेशालिटी आहे. नुकतेच आगामी काळात अकोला आणि यवतमाळ येथे सुपर स्पेशालिटी तयार होणार आहेत. विदर्भातील सरकारी यंत्रणेत चार ठिकाणी सुपर स्पेशालिटी तयार झाल्यास विदर्भासहित चार राज्यातील गरीब जनतेच्या आरोग्यासाठी सज्ज होतील. विशेष उपचारासह डायलिसिसची सोय होईल, यामुळे किडनी विकाराच्या रुग्णांसाठी 4 सुपर स्पेशालिटी रुग्णालये वरदान ठरतील, 

ताज्या आणि अचूक बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा 'सकाळ' चे मोबाईल अॅप! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com