मेडिकलमध्ये मातांची गर्दी

Meyo-Medical
Meyo-Medical

नागपूर - गरोदरपणा हा स्त्रीच्या आयुष्याला ‘नवजीवन’ देणारा टप्पा आहे, असे म्हटले जाते. प्रसूतीपूर्व आणि नंतरच्या काळात तिला आहार-विहार-व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्यासाठीही विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

त्याचप्रमाणे तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात योग्य उपचार मिळावे हा तिचा हक्क आहे. परंतु, उपराजधानीत मेयो-मेडिकलसह डागा रुग्णालयात महिलांची प्रचंड गर्दी असते. येथील सारेच प्रसूती वॉर्ड हाउसफुल्ल असल्याचे चित्र आहे.

मेडिकलच्या लेबर वॉर्डात प्रसूतीसाठी आलेल्या महिलांची प्रचंड गर्दी असते. मेडिकलमध्ये प्रसूती विभागासाठी केवळ १८० खाटा आहेत. मात्र, तीनशेवर गर्भवती महिला भरती आहेत. प्रसूती वॉर्डातील खाटांची संख्या वाढविली जात नाही. तीस वर्षांपूर्वी १८० खाटा होत्या. आजही प्रसूती विभागात १८० खाटा आहेत. 

महिला रुग्णांची संख्या वाढत असून, दररोज ३०-३५  प्रसूती मेडिकलमध्ये होतात. हीच स्थिती मेयो रुग्णालयाची आहे. येथे ९० खाटांचा प्रसूती  विभाग आहे. येथेही मेडिकलप्रमाणेच चित्र आहे. 

एका खाटेवर दोन महिलांना ठेवण्यात येत असल्याने जीर्ण झालेल्या खाटांचे कंबरडे मोडण्याचीही भीती आहे.

५०० खाटांच्या ‘डागा’ ३२० खाटा महिलांसाठी 
डागा रुग्णालय ५०० खाटांचे झाले आहे. येथे रुग्णांची संख्या ८० ते ९० टक्के आहे. डागातील रुग्णांची संख्या हाउसफुल्ल असताना, मनुष्यबळ वाढवून मिळत नाही. प्रशासनाने पाचशे खाटांसाठी आवश्‍यक मनुष्यबळाचा तपशील गोळा केला. उपसंचालक कार्यालयाला सादर केला. परंतु, अद्याप मनुष्यबळवाढीचा प्रस्ताव कागदोपत्रीच आहे. महिलांच्या प्रसूतीसाठी डागा रुग्णालय प्रसिद्ध आहे. राज्यात मेडिकल आणि मेयोपेक्षा जास्त प्रसूती डागा रुग्णालयात होतात. राज्यात प्रसूती संख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर डागा आहे. अवघ्या ९ ते १० प्रसूतीतज्ज्ञांच्या भरोशावर वर्षभरात १५ हजार प्रसूतीचा पल्ला डागा रुग्णालय गाठते.  येथे दररोज ४० वर प्रसूती होतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com