औषध खरेदीचा तिढा सुटला; तुटवडा कायम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

अकोला - सर्दी, खोकला, व्हायरल फिवरसारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. मात्र, शासकीय वैद्यकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा कायम असून, हीच स्थिती राज्यातही कायम आहे. महिनाभरापूर्वीच सरकारने हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळाकडून औषध खरेदीला मान्यता असतानाही, राज्यभरातील अनेक शासकीय रुग्णालयांत आजही औषधांचा तुटवडा कायम आहे.

औषधांसह वैद्यकीय उपकरण आणि त्यासाठी आवश्‍यक वस्तू खरेदीसाठी शासनाने महिनाभरापूर्वीच हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळामार्फत खरेदीसाठी मान्यता दिली आहे. त्यासाठी आवश्‍यक निधीही मंजूर केला. मात्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात औषधांचा तुटवडा आहे.

अशातच सर्दी, खोकला आणि व्हायरल फीवरच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र, यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात औषधच उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे.

Web Title: medicine purchasing shortage

टॅग्स