सहा महिन्यांत औषधपुरवठा नियमित - डॉ. दीपक सावंत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

नागपूर - हाफकीन इन्स्टिट्यूटकडून औषध खरेदीस विलंब झाल्याची कबुली देत सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सहा महिन्यांत औषधीपुरवठा नियमित होईल, अशी ग्वाही विधान परिषदेत दिली.

नागपूर - हाफकीन इन्स्टिट्यूटकडून औषध खरेदीस विलंब झाल्याची कबुली देत सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सहा महिन्यांत औषधीपुरवठा नियमित होईल, अशी ग्वाही विधान परिषदेत दिली.

औषधी खरेदीस विलंब होत असल्याने ग्रामीण भागासह मेडिकल कॉलेजमध्ये औषधांचा तुटवडा असल्याकडे धनंजय मुंडे यांनी 5 जुलैला प्रश्‍नोत्तराच्या तासादरम्यान लक्ष वेधले होते. सार्वजनिक आरोग्य विभागाने मागील वर्षी 26 जुलैला हाफकीनकडून औषधी खरेदीचा निर्णय घेतला. संस्थेकडे हे अतिरिक्त काम दिले आहे. मात्र, हाफकीनला 168 कोटींचा औषधीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. मागील महिनाभरात 149 आदेश, तर पुढील महिनाभरात 70 आदेश पुन्हा काढण्यात येणार आहेत. औषधी खरेदीच्या 1,041 निविदा असून, बऱ्याच्या अंतिम टप्प्यात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनाही खरेदीचे आदेश दिले आहेत, असे उत्तर गुरुवारी सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले. संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनीही रुग्णांना 40 टक्के औषधांचा पुरवठा होईल, अशी स्थिती असल्याचे सांगितले. जयंत पाटील यांनी मात्र सरकारकडून हाफकीनचे लाड होत असल्याचा आरोप करून चर्चेची मागणी केली.

Web Title: medicine supply continue dr. deepak sawant