मेडिकलमध्ये पेटले पाणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

नागपूर - आशिया खंडातील सर्वांत मोठे रुग्णालय अशी ओळख मेडिललची आहे. रोज तीस लाख लिटर पाण्याची गरज मेडिकलमध्ये आहे. मेडिकलमध्ये पाणीपुरवठाही होतो, परंतु उन्हाळ्यात पाण्याची इतरत्र गळती होत असल्यामुळे रुग्णांची तहान भागविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना मात्र भटकंती करावी लागत असते. प्रशासनाकडून यासंदर्भात कोणतेही ठोस पावले उचलण्यात येत नसल्यामुळे येत्या काळात पाणीटंचाई अधिक गंभीर रूप धारण करेल अशीही चर्चा येथे आहे. 

वॉर्डात पाणी समस्या  
एकीकडे उकाडा वाढत आहे, तर दुसरीकडे मेडिकलमधील काही वॉर्डांत पाण्याचे दुर्भीक्ष आहे. वॉर्ड क्रमांक २७ मध्ये इतर वॉर्डातील रुग्णांचे नातेवाईक पाण्यासाठी गर्दी करतात. अनेक वॉर्डातील वॉटर कुलर बंद असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी समस्या निर्माण होते. विशेषत: स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र, मेडिसीन, शल्यक्रिया विभागाशी निगडित वॉर्डांना सर्वाधिक पाणी लागते. मात्र,  यातील बहुतांश ठिकाणी अंतर्गत जलवाहिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गळती आहे.

वॉर्डांमध्ये पिण्याचे पाणी कुलरला वापरले जात असल्याचे प्रकारही निदर्शनास आले आहेत. त्यामुळे मेडिकलमधील पाणीटंचाई ही कृत्रिम असल्याने पिण्यासाठी काही अंशी पाणी कमी पडत आहे. पिण्यासाठीच महापालिकेच्या पाण्याचा वापर करण्याच्या सूचना वॉर्डात दिल्या आहेत, इतर वापरासाठी मेडिकल परिसरातील जुन्या विहिरीतून पाणी घेण्याचा प्रशासन विचार करीत आहे, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

शस्त्रक्रियांनादेखील फटका  
ओसीडब्ल्यूकडून पाणी पुरविले जाते. मात्र, मेडिकलमधील अंतर्गत जलवाहिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने कृत्रिम पाणीटंचाईच्या झळा मेडिकलमध्ये भरती असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना सहन कराव्या लागत आहेत. शस्त्रक्रियांसह रुग्णालयातील रुग्ण सेवेवर क्वचितप्रसंगी पाणीटंचाई असल्याने शस्त्रक्रियादेखील पुढे ढकलण्यात येत असल्याची चर्चा चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये आहे. 

वाढीव पाणी पुरविण्याची गरज 
पाण्याची समस्या सोडविण्यासाठी मेडिकलला आणखी किमान ३० लाख लिटर पाण्याची गरज भासणार आहे. या खेरीज मेडिकलमध्ये ट्रॉमाकेअर युनिट सुरू झाले आहे. मेडिकलला आणखी वाढीव पाणी मिळावे यासाठी अंतर्गत पाण्याचे स्रोतदेखील उपलब्ध आहेत. शिवाय मेडिकलमधील अंतर्गत वाहिन्यांमधील लिकेजेस दूर केले, तर सध्या सुरू असलेला पुरवठादेखील पुरेसा होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने तडकाफडकी ही गळती थांबविण्यासाठी पाऊल उचलण्यात येईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

Web Title: medicla college water shortage