बरखास्त असताना माजी अध्यक्षांची "झेडपी'त बैठक

बरखास्त असताना माजी  अध्यक्षांची "झेडपी'त बैठक
नागपूर : राज्य सरकारने जिल्हा परिषदा बरखास्त करून पाच ठिकाणी प्रशासकांची नियुक्ती केली आहे. असे असतानाही नागपूर जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षांनी जिल्हा परिषदेत बैठक घेतली. या बैठकीला अनेक विभाग प्रमुखांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे बैठकीसाठी बंद असलेले अध्यक्षांचे कक्ष खुले करण्यात आले. माजी अध्यक्षांप्रती दाखविण्यात आलेले हे प्रेम नियमांचा भंग करणार असल्याने विभाग प्रमुख अडचणीत येणार असल्याचे बोलल्या जात आहे.
शासनाने जिल्हा सदस्यांना दिलेली मुदतवाढ संपुष्टात आणून प्रशासकाची नियुक्ती केली. त्यामुळे अध्यक्ष, सभापती यांना देण्यात आलेले सर्व अधिकार, सेवा परत घेण्यात आले. त्यांच्या कक्षालाही बंद करण्यात आले. नियमानुसार हे कक्ष खुले करण्याकरता सीईओंची मंजुरी आवश्‍यक आहे. काही दिवसापूर्वी माजी अध्यक्षांकरता बंद असलेले कक्ष खुले करण्यात आले. माजी अध्यक्षांनी बैठक घेत सर्व योजनांचा आढावा घेतला. या बैठकीला अनेक विभाग प्रमुख हजर होते. अचानक अध्यक्षांचे दालन उघडल्याने आणि विभागप्रमुख हातात फाइलींचा डोंगर घेऊन जात असल्याने अनेकांच्या भूवया उंचाविल्या.
प्रशासकीय संहितेचे उल्लंघन?
तब्बल तीन तास ही बैठक चालल्याची माहिती आहे. मतदारसंघातील रखडलेली कामे आचारसंहितेपूर्वी निकाली काढण्याच्या सूचना वजा आदेश देण्यात आले. बैठकीत काही सदस्यांनी तर विभागप्रमुखांची कानउघाडणी केल्याची माहिती आहे. ही बाब प्रशासकीय संहितेचे उल्लंघन असल्याचे सांगण्यात येते. विभागप्रमुखच बैठकीला असल्याने थेट हात घालण्याचे टाळत सीईओंनी नजिकच्या व्यक्तींकडून माहिती गोळा केल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com