पाणीटंचाईने मेळघाट होरपळतोय; महिलांची रानावनात पायपीट 

नारायण येवले 
रविवार, 13 मे 2018

चिखलदरा (अमरावती) : मेळघाटातील धारणी व चिखलदरा हा या दोन्ही तालुक्‍यांत पाणीटंचाई तीव्र झाली आहे. आदिवासी पाडे व वस्त्या तहानेने व्याकुळ झाल्या आहेत. रात्रीबेरात्री पाण्यासाठी आदिवासी बांधवांची भटकंती सुरू आहे. त्यातच पाण्यासाठी महिलांना रानावनात पायपीट करावी लागत आहे. मेळघाट हा डोंगरदऱ्यांचा भाग असून पावसाचे पाणी उतारावरून वाहून जाते. या पाण्याचा फायदा जिल्ह्यातील इतर भागांना होतो. पण मेळघाटातील छोटे पाडे, वस्त्या, ढाणा तहानलेलेच राहतात. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्‍न डोके वर काढतो; आणि पाऊस आला की हा प्रश्‍न पुन्हा दुसऱ्याच वर्षी चर्चेला येतो. गेल्या दोन दशकांपासून हेच सुरू आहे. परंतु, कायमस्वरूपी उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नाहीत.

चिखलदरा (अमरावती) : मेळघाटातील धारणी व चिखलदरा हा या दोन्ही तालुक्‍यांत पाणीटंचाई तीव्र झाली आहे. आदिवासी पाडे व वस्त्या तहानेने व्याकुळ झाल्या आहेत. रात्रीबेरात्री पाण्यासाठी आदिवासी बांधवांची भटकंती सुरू आहे. त्यातच पाण्यासाठी महिलांना रानावनात पायपीट करावी लागत आहे. मेळघाट हा डोंगरदऱ्यांचा भाग असून पावसाचे पाणी उतारावरून वाहून जाते. या पाण्याचा फायदा जिल्ह्यातील इतर भागांना होतो. पण मेळघाटातील छोटे पाडे, वस्त्या, ढाणा तहानलेलेच राहतात. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्‍न डोके वर काढतो; आणि पाऊस आला की हा प्रश्‍न पुन्हा दुसऱ्याच वर्षी चर्चेला येतो. गेल्या दोन दशकांपासून हेच सुरू आहे. परंतु, कायमस्वरूपी उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नाहीत. जलसंधारणाच्या नावावर मेळघाटात मोठ्या प्रमाणात कामे हाती घेतली जातात; परंतु प्रत्यक्षात पाण्याचा साठा होताना दिसत नाही. आपापल्या सोयीनुसार सगळी कामे या भागात होत असताना अधिकारी आणि ठेकेदार गब्बर होत आहेत. मेळघाटची जनता आजही पाण्यासाठी अर्धा दिवस घालवते. विशेषतः महिलांना पाण्यासाठी प्रचंड पायपीट करावी लागते आणि सगळ पाणी डोक्‍यावरूनच आणावे लागते.

पशुधन संकटात
 : मेळघाटात पशुधन मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न बिकट झाला आहे. जेथे माणसालाच पिण्याचे पाणी मिळत नाही, तेथे पशूंची  अवस्था आणखी बिकट आहे. गुरांना पाणी पाजण्यासाठी मेळघाटात आदिवासी बांधव आठ ते दहा किलोमीटर पायपीट करून जात असल्याची स्थिती आहे.

येथे आहे तीव्र पाणीटंचाई
 : सध्या चिखलदरा तालुक्‍यात कोरडा, गांगरखेडा, घाणा, पाचडोंगरी, कोयलारी, खोंगडा, सोनापूर, खटकाली यांसह शेकडो गावांत पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. काही गावात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असला, तरी इतर गावांत मात्र पाण्यासाठी दाही दिशा अशी अवस्था कायम आहे.

Web Title: melghat faced water shortage