अमरावती : मेळघाटात दरड कोसळली; राणीगाव-कांजोली मार्ग बंद

अमरावती : मेळघाटात दरड कोसळली; राणीगाव-कांजोली मार्ग बंद
SYSTEM

धारणी (जि. अमरावती) : मेळघाटात तीन दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे धारणीपासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या राणीगाव-कांजोली मार्गावर दरड कोसळली. त्यामुळे हा मार्ग सध्या बंद झाला आहे. दरड कोसळल्याने राणीगाव, गोलाई, कंजोळी, मोथा खेडा, सीनबंद व सावलीखेडा परिसरातील काही गावांचा संपर्क तालुका मुख्यालयाशी तुटला आहे. (Melghat-landslide-heavy-rainfall-Amravati District-nad86)

मेळघाटात तीन दिवसांपासून संततधार सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झालेले आहे. मेळघाटातील नदी-नाल्यांना महापूर आला आहे. मेळघाटातील जीवनदायी म्हटली जाणारी सिपना व गडगा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. गडगा व सिपना नदीचे पाणी काही गावांतसुद्धा शिरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

अमरावती : मेळघाटात दरड कोसळली; राणीगाव-कांजोली मार्ग बंद
बाजारात दाखल झाले ‘कोरोनाफळ’; मिळतोय ७० रुपये पाव दराने

तालुका प्रशासनाने नदीच्या काठी वसलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, नदीला पूर आल्याने त्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांचे अवस्था दयनीय झाली आहे. अमरावती-इंदूर महामार्गाची वाहतूक सेमाडोह येथे नदीला पूर आल्याने विस्कळीत झाली होती.

रात्री मुसळधार पावसामुळे राणीगाव मार्गावर मोठी दरड कोसळली. प्रशासनाच्या मदतीने दरड रस्त्यावरून हटविण्याचा प्रयत्न करीत आहोत.
- प्रवीण मावसकर, तलाठी

(Melghat-landslide-heavy-rainfall-Amravati District-nad86)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com