मेळघाटचा पट्टेदार वाघ रेल्वेस्थानकाच्या भिंतीवर

भूषण काळे
शुक्रवार, 29 जून 2018

अमरावती - मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील पट्टेदार वाघ सहजासहजी डोळ्याने दिसत नसला तरी मेळघाटचे घनदाट जंगल व वाघाला बघण्यासाठी दरवर्षीच मोठ्या संख्येने पर्यटक मेळघाटात येतात. हेच मेळघाटचे सौंदर्य, तेथील वन्यजीव, वनस्पती तथा दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन आता अमरावतीच्या मॉडेल रेल्वेस्थानकावर होणार आहे. मेळघाटच्या सौंदर्याचे दर्शन प्रवाशांना व्हावे, पर्यावरणाचे संवर्धन अबाधित राहावे अन्‌ रेल्वेस्थानकाचा परिसर सुशोभित करण्याच्या उद्देशाने मेळघाट व्याघ्रप्रकल्पातर्फे हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.

राजस्थानमधील रणथंबोर रेल्वेस्थानकावर पहिल्यांदा हा प्रयोग करण्यात आला होता. त्याच धर्तीवर मेळघाट व्याघ्रप्रकल्पातर्फे अमरावतीच्या मॉडेल रेल्वेस्थानकावर हा अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार, सध्या अमरावतीच्या रेल्वेस्थानकावर भिंती रंगविण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच अमरावतीच्या मॉडेल रेल्वेस्थानकाचे सौंदर्य खुलणार आहे. मेळघाटातील पट्टेदार वाघासोबतच अस्वल, जंगली घुबड, मेळघाटचे जंगल, तसेच तेथील आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारी चित्रेही या भिंतीवर चितारण्यात येणार आहेत. वन्यप्राण्यांच्या पेंटिंगसोबतच त्याच्या शिल्पाकृतीही या ठिकाणी लावले जाणार आहेत.

मेळघाट व्याघ्रप्रकल्पातर्फे अमरावती, बडनेरा, अकोला व शेगाव या चार स्थानकांवर भिंती रंगविण्याचे काम केले जाणार आहे. येत्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण होईल. मेळघाट व्याघ्रप्रकल्प, नरनाळा, गुगामल, ज्ञानगंगा अभयारण्य, काटेपूर्णा अभयारण्य अशा विविध अभयारण्यांचा यात समावेश आहे.
- श्रीनिवासा रेड्डी, संचालक, मेळघाट व्याघ्रप्रकल्प

खासदार अडसूळांचा पाठपुरावा 
अमरावती रेल्वेस्थानकाच्या भिंतीवर मेळघाटचे चित्र रंगविण्यासंदर्भात खासदार आनंद अडसूळ यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. त्यांनी स्वतः या उपक्रमात जातीने लक्ष घालून रेल्वेविभागाकडून परवानगी मिळवून दिली. रेल्वेस्थानकाच्या माध्यमातून निश्‍चितच मेळघाटची ओळख देशभर जाईल, असा विश्‍वास खासदार आनंद अडसूळ यांनी व्यक्त केला. 

Web Title: melghat tiger project railway station wall tiger picture