शाळानिहाय सभासद नोंदणीला सुरवात

शाळानिहाय सभासद नोंदणीला सुरवात
नागपूर : "सकाळ माध्यम समूहा'च्या न्यूज पेपर इन एज्युकेशन (सकाळ एनआयई) या विद्यार्थीप्रिय उपक्रमाची शाळानिहाय सभासद नावनोंदणी सुरू झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या उपक्रमासाठी 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी 150 रुपये शुल्क आहे. मराठी शाळांमध्ये हा उपक्रम करणारे "सकाळ' हे महाराष्ट्रातील एकमेव दैनिक आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, नवी मुंबई या ठिकाणी हा उपक्रम होत आहे. सुमारे पाचशेहून अधिक शाळांमधील विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेत आहेत.
"सकाळ एनआयई'च्या वतीने वर्षभरात कलाकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, वाचनकौशल्ये, लेखन कौशल्ये अशा विषयांवर शाळानिहाय कार्यशाळा, तसेच ग्रेड परीक्षा मार्गदर्शन, इको गणेशा, आंतरशालेय नाट्य स्पर्धा, शालेय शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन, शिक्षक प्रशिक्षण यासारख्या कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. याचबरोबर शैक्षणिक वर्षात "सकाळ एनआयई'चे 18 अंक सभासदांना मिळतील. यात अनेकविध लेख, गंमतकोडी यांचा समावेश असेल, तसेच विद्यार्थ्यांना शालोपयोगी भेटवस्तू देण्यात येईल. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड हे या उपक्रमाचे राज्यस्तरीय प्रायोजक आहेत.
आपल्या शाळेतील अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग या उपक्रमात व्हावा, यासाठी मुख्याध्यापकांनी सहकार्य करावे, असे आवाहन "सकाळ एनआयई'च्या वतीने केले आहे. अधिक माहितीसाठी 9130097511, 9881243681 या क्रमांकावर संपर्क करावा.
  • वार्षिक सभासद नोंदणी शुल्क रक्कम 150/- रुपये
  • शैक्षणिक वर्षात सकाळ एनआयईचे 18 पाक्षिक अंक
  • शैक्षणिक भेटवस्तू शाळानिहाय कार्यशाळा, तसेच विविध कार्यक्रम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com