देशातील पहिली अद्ययावत मेमू नागपूर विभागात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या टप्पा 3 मधील 12 डब्यांची अद्ययावत मेमू ट्रेन नागपूर विभागाच्या ताफ्यात दाखल होत आहे. भारतीय रेल्वेत आपल्या पद्धतीची ही पहिलीच रेल्वेगाडी आहे. बसण्याची अधिक व्यवस्था असल्याने प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

टप्पा 3 मधील ही 12 डब्यांची मेमू इलेक्‍ट्रॉनिक प्रणालीवर धावते. पण, या गाडीला पारंपरिक म्हणजेच डिझल ट्रॅक्‍शनमध्ये बदलण्यात आले आहे. या गाडीला 3 मोटार कार आणि 9 ट्रेलर कार आहेत. ही गाडी 68804 क्रमांकासह नागपूर विभागातील गोंदिया-चांदाफोर्ट-बल्लारशा आणि गोंदिया-बालाघाट-समनापूरदरम्यान धावेल. ही अद्ययावत मेमू अनेक सेंसर्सनी सुसज्जित आहे. इंजिनचालकासह अन्य सामान्य सुरक्षाविषयक बाबींसाठीसुद्धा उपयुक्त यंत्रणा त्यात आहे. प्रत्येक डब्यात स्वयंचलित यंत्रणा असून ब्रेकिंग ऑपरेशन, अग्निशमन यंत्रणा, एलईडी लाइट, ऑडिओ-विज्युअल सिस्टिमही सज्ज आहे.
उपयुक्त आणि आरामदायी
प्रवाशांना डब्यातच येणाऱ्या स्टेशनची तसेच गाडीच्या थांब्याच्या वेळेबाबत माहिती मिळणार आहे. एअर सस्पेंशन स्प्रिंगसोबतच स्टेलनेस स्टील बॉडी असल्याने सुरक्षेच्या दृष्टीनेही ती उपयुक्त आणि आरामदायी आहे. स्वच्छ भारत मिशन संकल्पनेनुसार प्रत्येक शौचालयात बायोटॉयलेट बसविण्यात आले आहेत. ब्रांडेड साहित्यांसह दर्जेदार इंटिरीयर असल्याने प्रवासाचा प्रसन्न अनुभव प्रवाशांना घेता येईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Memu in Nagpur section