मतदानात पुरुषांची आघाडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

देशाच्या इतिहासात प्रथमच संसदेत 78 महिला खासदार आहेत. एवढेच नव्हे लोकसभा निवडणुकीत देशात पुरुष व महिलांनी केलेल्या मतदानाचीही टक्केवारी सारखी असल्याने महिलांही पुरुषांच्या मागे नसल्याचे चित्र होते. मात्र, अद्यापही महिलांमध्ये मतदानाबाबत जनजागृती झाली नसल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीतून स्पष्ट झाले. 

नागपूर : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात झालेल्या मतदानात महिलांचा निरुत्साह दिसून आला. दर निवडणुकीच्या मतदानात महिलांची टक्केवारी पुरुषांच्या तुलनेत कमीच आहे. महिलांची टक्केवारी वाढविण्यासाठी सखी मतदान केंद्रही लावण्यात आले. मात्र, महिलांची मतदानात टक्केवारी वाढविण्यात प्रशासनालाही अपयश आल्याचेच चित्र आहे. जिल्ह्यात 54.79 टक्के महिलांनी मतदान केले तर पुरुषांची टक्केवारी 59.47 आहे. 
देशाच्या इतिहासात प्रथमच संसदेत 78 महिला खासदार आहेत. एवढेच नव्हे लोकसभा निवडणुकीत देशात पुरुष व महिलांनी केलेल्या मतदानाचीही टक्केवारी सारखी असल्याने महिलांही पुरुषांच्या मागे नसल्याचे चित्र होते. मात्र, अद्यापही महिलांमध्ये मतदानाबाबत जनजागृती झाली नसल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीतून स्पष्ट झाले. 
जिल्ह्यात 41 लाख 71 हजार 420 मतदारांत 20 लाख 36 हजार 399 महिला मतदार आहेत. यातील 11 लाख 15 हजार 758 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानात महिलांची टक्केवारी 54.79 टक्के आहे. 21 लाख 34 हजार 921 पैकी 12 लाख 69 हजार 718 पुरुष मतदारांनी मतदान केले. पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी 59.47 टक्के आहे. स्वातंत्र्यानंतर महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीत सातत्याने वाढ झाली असली तरी अद्यापही पुरुषांच्या तुलनेत टक्केवारी कमी आहे. यात ग्रामीण व शहरी दोन्ही भागातील महिला मतदानाबाबत गंभीर नाही किंवा त्यांना वेळ मिळाला नाही, अशी अनेक कारणे पुढे येत आहे. 
जिल्ह्यातील रामटेक, काटोल, सावनेर, कामठी, हिंगणा, उमरेड या सहाही मतदार संघांत महिलांच्या मतदानाची टक्केवारी 62.48 तर पुरुषांची टक्केवारी 66.40 आहे. शहरातील महिलांबाबत यापेक्षा वेगळे चित्र नाही. सुशिक्षित असूनही अनेक महिला मतदानासाठी घराबाहेर पडल्या नसल्याचे शहरातील सहाही मतदार संघांतील टक्केवारीतून दिसून येत आहे. शहरातील सहाही मतदार संघांत 48.12 टक्के महिलांनी मतदान केले. त्या तुलनेत पुरुषांची टक्केवारी 53.19 आहे. महिला ग्रामीणमधील असो की शहरातील मतदानात निरुत्साहाबाबत त्यांच्यात साम्य दिसून येत आहे. 
मतदानात महिला व पुरुषांची टक्केवारी
काटोल 71.21 67.55 
सावनेर 69.92 65.62 
हिंगणा 61.33 58.64 
उमरेड 71.51 67.09 
कामठी 61.01 56.41 
रामटेक 68.03 64.03 
दक्षिण-पश्‍चिम 51.40 48.33 
दक्षिण नागपूर 52.60 47.98 
पूर्व नागपूर 55.82 50.58 
मध्य नागपूर 54.82 46.39 
पश्‍चिम नागपूर 51.48 46.93 
उत्तर नागपूर 53.16 48.30 
एकूण 59.47 54.79 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Men's lead in voting