लॉजमध्ये व्यापाऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

नागपूर : अमरावती येथील एका कापड विक्रेत्याने सीताबर्डी मेन रोडवरील नीलम लॉज येथे गळफास लावून आत्महत्या केली. जितेंद्र नारायणदास नावानी (31, रामपुरी कॅम्प, गाडगेनगर, अमरावती) असे आत्महत्या करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र हा अमरावती कपडे विकण्याचा व्यवसाय करीत होता. त्यातच त्याचे पत्नीसोबत पटत नसल्याने त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. त्यामुळे तो मानसिकदृष्ट्या त्रस्त होता. 6 सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास तो नीलम लॉज येथे आला होता. 250 रुपये देऊन त्याने खोली बुक केली. त्यानंतर तयार होऊन तो बाहेर गेला होता. शनिवारी दुपारी चारपर्यंत तो खोलीतून बाहेर न आल्याने लॉजच्या कर्मचाऱ्यांना संशय आला. कर्मचाऱ्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता तो गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Merchant suicide in lodge