पालकमंत्री, आमदारांचा मेट्रोतून प्रवास

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

नागपूर - महामेट्रोच्या माझी मेट्रोतून प्रवासाबाबत नागपूरकरांना उत्सुकता आहे.  जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्यांनीही मेट्रो सफारीचा आनंद लुटला. महा मेट्रोच्या कोचेसमधून होणारा प्रवास येत्या  काळात पर्यटनासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास यावेळी लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला. 

मेट्रोने आतापर्यंत अनेक सेलेब्रिटी, विद्यार्थी, पत्रकारांसाठी जॉय राईडचे आयोजन केले. शनिवारी प्रथमच जिल्ह्यातील विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांसाठी ‘सेरिमोनियल राईड’चे एअरपोर्ट (साउथ) स्टेशन-न्यू एअरपोर्ट-खापरी स्टेशनपर्यंत आयोजन केले. यात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, आमदार सुधाकर देशमुख, आमदार डॉ.  मिलिंद माने, आमदार समीर मेघे, आशीष देशमुख, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, आमदार प्रा. अनिल सोले यांचा सहभाग होता. याशिवाय जिल्हा परिषद सदस्य रूपराव शिंगणे, पंचायत समिती सदस्या रेखा मसराम, खापरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पार्वता आत्राम, उपसरपंच सेवकाराम सोनटक्के, ग्रामपंचायत सदस्य नितीन लोखंडे, ओमप्रकाश तेलरांधे, सचिन वानखेडे, प्रभाकर जुमडे, सिंधू झाडे, बेबी धुर्वे, प्रियतमा वाघाडे, लता गवई आणि लक्ष्मी मसराम यांनीही मेट्रोतून प्रवासाचा आनंद लुटला. प्रवासादरम्यान महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित उपस्थित होते. एअरपोर्ट साउथ स्टेशन येथे पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष तिकीट काढून तिकीट विक्री व्यवस्था जाणून घेतली. न्यू एअरपोर्ट स्टेशन येथील भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. यावेळी संचालक (प्रकल्प) महेश कुमार, संचालक (रोलिंग  स्टॉक) सुनील माथूर, संचालक (वित्त) एस. शिवमाथन उपस्थित होते.

पालकमंत्री, आमदारांनी केले कौतुक 
मेट्रोचे तिन्ही स्टेशन जागतिक दर्जाचे असल्याचे निरीक्षण पालकमंत्री बावनकुळे यांनी नोंदविले. येत्या काळात मेट्रोचा प्रवास पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र बनेल, असे मत आमदार सुधाकर देशमुख आणि आमदार प्रा. अनिल सोले यांनी व्यक्त केले.

Web Title: metro journey guardian minister and mla