मेट्रो रेल्वेसाठी "जम्बो' कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

नागपूर - मेट्रो रेल्वे प्रकल्पाआड येणाऱ्या कॉटन मार्केट परिसरातील अनेक वर्षांचे अतिक्रमण आज (ता. 12) भुईसपाट करण्यात आले. या कारवाईदरम्यान दुकानदारांनी विरोध केल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. परंतु, पोलिसांची मोठी कुमक असल्याने दुकानदारांचा विरोध मोडीत काढत कारवाई पूर्ण केली. 

नागपूर - मेट्रो रेल्वे प्रकल्पाआड येणाऱ्या कॉटन मार्केट परिसरातील अनेक वर्षांचे अतिक्रमण आज (ता. 12) भुईसपाट करण्यात आले. या कारवाईदरम्यान दुकानदारांनी विरोध केल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. परंतु, पोलिसांची मोठी कुमक असल्याने दुकानदारांचा विरोध मोडीत काढत कारवाई पूर्ण केली. 

कॉटन मार्केट परिसरात मेट्रो रेल्वेचे स्टेशन होणार आहे. या स्टेशनसाठी महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तरीत्या अतिक्रमणविरोधी कारवाईला सकाळी 9 वाजतापासून प्रारंभ केला. सकाळी अतिक्रमणविरोधी पथकासोबत बुलडोझर, पोलिसांची मोठी कुमक होती. नेहमी किरकोळ कारवाई अनुभवणाऱ्या या चौकाने आज प्रथमच "जम्बो' कारवाईचा थरार अनुभवला. कारवाईबाबत सर्वच दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली होती. परंतु काही दुकानदारांनी न्यायालयातून या कारवाईला स्थगिती मिळवली होती. स्थगिती मिळविणाऱ्या दुकानदारांचा अपवादवगळता नोटीस मिळालेल्या दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली होती. परंतु स्थगितीचा कालावधी संपुष्टात येताच विजय टॉकीजपासून कॉटन मार्केट चौक मार्गावर असलेल्या बार, रेस्टॉरंट आणि काही दुकानांचे अतिक्रमण बुलडोझरने तोडण्यात आले. अर्जुन बार, शीतल बार, इंद्राणी भोजनालय, तुमसरे यांची प्रेस, संदीप ट्रान्सपोर्ट या मालकांनी स्थगिती मिळविली होती. आज स्थगितीचा कालावधी संपुष्टात आल्याने कारवाई करण्यात आली. 

पोलिसांच्या ताफ्यामुळे छावणीचे रूप 
या कारवाईसाठी शेकडो पोलिसांचा ताफा येथे तैनात करण्यात आला होता. त्यामुळे परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. काही महिन्यांपूर्वी कारवाईसाठी गेलेल्या पथकाला दुकानदारांनी तीव्र संताप व्यक्त करीत विरोध केला होता. त्यामुळे यावेळी अतिक्रमणविरोधी पथकाने मोठ्या प्रमाणात पोलिसांची कुमक मागितली होती. पोलिसांनी विजय सिनेमा ते कॉटन मार्केट चौकापर्यंतचा संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी बंद केला होता. या परिसरात बॅरिकेड्‌स लावून कारवाई करण्यात आली. ही कारवाई बघण्यासाठी अनेकांनी गर्दी केली.

Web Title: metro railway metro