मेट्रोसह संत्रानगरीचा परिवर्तनाकडे प्रवास

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

नागपूर - दहा वर्षे रामझुल्याचे रखडलेले काम पाहणाऱ्या जुन्या पिढीसाठी मेट्रो  रेल्वेच्या कामाची गती आश्‍चर्यात टाकणारी आहे. नव्या पिढीसाठी मात्र मेट्रो रेल्वे अभिमानाची बाब असल्याचे नुकत्याच आयोजित मेट्रो रेल्वे फोटोग्राफी स्पर्धेतून दिसून आले. मेट्रो रेल्वेसोबत संत्रानगरीच्या परिवर्तनाच्या प्रवासाचे टिपलेले छायाचित्र नागपूरकरांसाठी ऐतिहासिक वारसा ठरणार असून प्रत्येक स्टेशन, डबल डेकर पुलाच्या कामाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

मेट्रो रेल्वेच्या खापरी, न्यू एअरपोर्ट, एअरपोर्ट साउथ स्टेशनची कामे अंतिम टप्प्यात असून ॲडग्रेडवरून (जमिनीवरील) मेट्रो धावण्यास काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.

मात्र, इतर स्टेशनची कामेही वेगाने सुरू आहे. यात विमानाने देश-विदेशातून येणारे व्हीआयपी, सेलिब्रेटीजना सर्वप्रथम मेट्रो रेल्वे स्टेशन दृष्टीस पडणार आहे. त्यामुळे हे मेट्रो स्टेशन जागतिक दर्जाचे करण्यासाठी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांचे प्रयत्न सुरू  आहे. या स्टेशननंतर वर्धा मार्गावरील दुहेरी उड्डाणपूल, त्या खालील पिलर आकर्षक करण्यात येत आहे. वर्धा मार्गावरील मेट्रो रेल्वेच्या पिलरला व्हर्टिकल गार्डन तयार करून महामेट्रोने पर्यटकांनाही आकर्षित करण्याचे काम सुरू केले. वर्धा रोडवरून जाताना मेट्रो रेल्वेच्या सुरू असलेल्या डबर डेकर पुलाच्या बांधकामाकडे सहज लक्ष जाते. या पुलाच्या बांधकामाबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. चौपदरी डबल डेकर पूल पिलर नंबर ४१ ते ५७ पर्यंत सहापदरीही राहणार आहे. यामुळे मनीषनगर रेल्वे ओव्हरब्रिज व अंडरपासचा ब्रिज येऊन जोडल्या जाईल. या भागात ४८० मीटरचा हा पूल सहापदरी राहणार असून याची रुंदी २६.५ मीटर राहील. उर्वरित चौपदरी पुलाची रुंदी १९.५ मीटर राहील.

बदलत्या प्रवासाचे साक्षीदार
आकर्षण राहणार आहे ते सीताबर्डी येथील इंटरचेंज स्टेशनचे. आयकॉनिक टॉवर म्हणून त्याचा उल्लेख करण्यात येत असून ते इंग्रजीतील ‘एल’ आकाराचे राहणार आहे. खापरी ते इंटरचेंजपर्यंत मार्च २०१९ पर्यंत मेट्रो धावण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यादृष्टीने वेगाने कामे सुरू आहे. वर्धा मार्गच नव्हे तर सेंट्रल एव्हेन्यू, हिंगणा मार्ग, कामठी मार्गाने मेट्रोचे वेगाने काम सुरू आहे. ही कामे उपराजधानी बदलत असल्याचा पुरावा असून अनेक पिढ्या  संत्रानगरीच्या बदलत्या प्रवासाचे साक्षीदार ठरत आहेत.

Web Title: metro railway work development