esakal | आज मेट्रो ट्रॅकची पाहणी
sakal

बोलून बातमी शोधा

आज मेट्रो  ट्रॅकची पाहणी

आज मेट्रो ट्रॅकची पाहणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नागपूर : येत्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंगणा मार्गावरील मेट्रोचे लोकार्पण करणार असून, त्यादृष्टीने महामेट्रोने तयारी चालविली आहे. या मेट्रो मार्गाच्या पाहणीसाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त जनककुमार गर्ग अधिकाऱ्यांसह उद्या, मंगळवारी नागपुरात दाखल होत आहे. तीनदिवसीय दौऱ्यात ते ट्रॅक, रेल्वे स्टेशन, सिग्नल प्रणाली आदींची पाहणी करणार आहेत.
हिंगणा मार्गावर लोकमान्यनगर ते सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रो रेल्वे धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी या मार्गावर मेट्रो रेल्वेला हिरवी झेंडी दाखविणार आहे. त्यामुळे या मार्गावर मेट्रो रेल्वे धावण्यासाठी सर्व आवश्‍यक तांत्रिक बाबी तपासणी करण्यात येणार आहेत. यासाठी उद्या, मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) पथक उद्या येणार आहे. पुढील तीन दिवसांत पथक मेट्रो स्टेशन, रोलिंग स्टॉक, डेपो, ट्रॅक व संबंधित उपकरणांसह इतर सुविधांचे परीक्षण करणार आहे. उद्या, सीएमआरएस आयुक्त जनककुमार गर्ग मेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत हिंगणा डेपोला भेट देणार आहेत. अधिकाऱ्यांशी प्रकल्पावर चर्चा केल्यानंतर चीन येथून आणण्यात आलेल्या रोलिंग स्टॉक (मेट्रो कोच), डेपोमधील सुरक्षेची साधने, उपाययोजना, तांत्रिक कक्ष, रखरखावाचे दस्तऐवज, आपत्कालीन मार्गाची सुविधा आदींची पाहणी करणार आहेत.
loading image
go to top