बाळाला छातीशी कवटाळून काढली रात्र!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

सहा तासांच्या लेकरासह मातेने काढली उघड्यावर रात्र

नागपूर - सहा तासांपूर्वी जन्मलेल्या चिमुकल्या बाळासह मातेला उपचारापासून वंचित ठेवले. नव्हे, तर जबरन सुटी दिली. या मातेने बाळाला छातीशी कवटाळून रात्र उघड्यावर काढली. हृदय हेलावून टाकणारा हा प्रकार इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) मंगळवारी रात्री घडला. लेबर वॉर्डातील डॉक्‍टरांच्या हेकेखोरपणाचा हा उत्तम नमुना मेयोत बघायला मिळाला. मेयो म्हणजे कत्तलखाना हे आमदारांच्या अंदाज समितीने कधीकाळी केलेले वक्तव्य डॉक्‍टरांच्या असभ्य वागणुकीमुळे खरे ठरले. 

मंगळवारी दुपारी अडीचची वेळ. सावनेर मार्गावरील वडगावातील घटना. येथील झोपडीत धनेश्‍वरी निशाद या गर्भवती मातेला प्रसूतीच्या वेदना असह्य झाल्या. झोपडीतच प्रसूती झाली. मातेला तत्काळ शेजारी महिलेने नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. रक्तक्षय असल्याने धनेश्‍वरीला तत्काळ मेयोत रेफर करण्यात आले. अवघ्या तासाभरात लेकराला घेऊन धनेश्‍वरी पती संतोष आणि शेजारी महिला पुष्पा मेयोत पोहोचली. लेबरवॉर्डात भरती करण्यात आले. धनेश्‍वरीला भोवळ आली. 

परंतु, तिच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. सहा तास उलटले. वॉर्डात महिला डॉक्‍टर नव्हती. परिचारिका लिपिकीय कामात गुंतली होती. परंतु, तिला तपासले नाही. अखेर एका डॉक्‍टरने तपासणी केली. दरम्यान, त्याच्याकडून असभ्य वर्तन होत असल्याची जाणीव धनेश्‍वरीला झाली, असे खुद्द बोलून दाखवले. ओरडण्याचा प्रयत्न करताच डॉक्‍टर भडकले. त्यांनी उर्मटपणे बोलणे सुरू केले. डॉक्‍टर धनेश्‍वरीवर ओरडल्याचा दुजोरा पुष्पाने दिला. ‘चलो छुट्टी ले... लो’ चलो, भागो यहाँसे... असे म्हणत केसपेपरवर सह्या घेतल्या. औषधोपचार तर केला नाहीच. खाटेवरून जबरदस्तीने प्रसूत महिलेस टाकून बोलणे सुरू केले. उपचार होत नसल्यामुळे ही महिला अक्षरशः रडकुंडीला आली. महिलेचा पती संतोषने अखेर केसपेपरवर सह्या केल्या. डॉक्‍टरांनी लेकरांसह अक्षरशः वॉर्डाबाहेर काढले. सहा तासांच्या लेकराला मातेसह अशाप्रकारे हाकलण्याचा प्रकार करून डॉक्‍टरने पवित्र व्यवसायाला काळिमा फासला.

रक्त तपासणीसाठी ७०० रुपये
गरीब लोकं उपचार मिळतील, या आशेवर मेयोत येतात. परंतु, मेयोत गरिबांवर उपचार करण्याऐवजी त्यांचा छळ करतात. रक्ताच्या तपासणीसाठी बाहेर पाठवतात. धनेश्‍वरीचे कुटुंब स्थलांतरित आहे. पैसे नसतानाही डॉक्‍टरांनी तिला खासगी पॅथॉलॉजीत पाठवले. ७०० रुपयांच्या तपासणी केल्या, अशी तक्रार या कुटुंबाला रात्री मदत करणारे आरबीएस सामाजिक संस्थेचे सदस्य संदीप श्रीवास यांनी सांगितले. शिकाऊ डॉक्‍टर तसेच परिचारिका अतिशय उर्मटपणे वागत असल्याची तक्रार त्यांनी केली. धनेश्‍वरीच्या कुटुंबाच्या मदतीला श्रीवास आणि त्याची पत्नी धावून आली.

मेयोत उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाचा अधिकार आहे. या प्रकरणाची आपल्याकडे  कोणतीही तक्रार आली नाही. तक्रार आल्यास चौकशी करण्यात येईल. डॉक्‍टरांकडून चूक झाली असल्यास दोषीवर कारवाई करू.
- डॉ. प्रदीप दीक्षित, अधिष्ठाता, मेयो

Web Title: meyo hospital issue