म्हसोला आर्णी बस पुलावरून कोसळली; चालकासह सात प्रवासी जखमी

सचिन शिंदे
रविवार, 26 ऑगस्ट 2018

म्हसोला गावाजवळील पुलावर पुराचा गाळ साचला असल्याने बस त्यावरून घसरली आणि पाण्यात कोसळली.

आर्णी - दारव्हा आगाराची बस आर्णी वरून म्हसोला मार्गे पहुर येथे रात्री निवासी असते. नेहमीप्रमाणे ता. 25 ला सायंकाळी एम एच 06. एस 8138 क्रमांकाची बसवाहक व्हि. राठोड व वालक ए. घोडाम हे घेऊन गेले होते. रात्रभर पहुर येथे मुक्काम झाल्यावर ता 26 अॉगस्ट ला सकाळी 6:30 वाजता आर्णी जात असतांना सोबत पहुर येथील स्नेहलता मधुकर पेटकर 73, जयप्रविण पेटकर 20, कार्तिक संजय पेटकर 30, क्रिष अविनाश पेटकर, केशव बापुराव ऊके 40, जयश्री केशव ऊके 36, यश केशव ऊके 4 जात असतांना म्हसोला गावाजवळील पुलावर पुराचा गाळ साचला असल्याने बस त्यावरून घसरली आणि पाण्यात कोसळली. यामध्ये स्नेहलता पेटकर, यश ऊके, वाहक व्हि. राठोड यांना गंभीर मार लागला असुन बाकींना किरकोळ जखमी झाले आहेत. यांना ग्रामस्थांनी आर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असुन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

Arni accident

Web Title: Mhasola Arni bus collapses from bridge

टॅग्स