मायक्रो एटीएममधून काढा दोन हजार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

नागपूर - पाचशे व एक हजारची नोटा चलनातून बंद केल्याने पैसे भरण्यासाठी व काढण्यासाठी बॅंकेत मोठ-मोठ्या रांगा लागत आहेत. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात त्रास होत आहे. तो टाळण्यासाठी नागरिकांना सहजरीत्या पैसे भरणे व काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मायक्रो एटीएमसह विशेष काउंटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यातून दोन हजार रुपयांची रक्कम काढता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ऍक्‍सिस बॅंकेतर्फे मायक्रो एटीएमद्वारे दोन हजार रुपयांपर्यंत पैसे काढण्याच्या व्यवस्थेचा प्रारंभ जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या हस्ते झाला. ऍक्‍सिस बॅंकेचे सर्कल हेड एस. आर. नंदा, शाखा व्यवस्थापक पंकज गाडेकर, रवींद्र खोत तसेच सचिन जळगावकर उपस्थित होते. 20 लाख रुपयांचे चलन बदलवून देण्यात आले आहेत.

Web Title: Micro ATM Remove from two thousand