बारसाठी प्रवासी निवारा भुईसपाट!

नागपूर : प्रवासी निवारा व झाडे जमीनदोस्त करताना जेसीबी व कामगार.
नागपूर : प्रवासी निवारा व झाडे जमीनदोस्त करताना जेसीबी व कामगार.

भिवापूर (जि. नागपूर) : बिअरबार राष्ट्रीय महामार्गावरून दिसावा यासाठी चक्क प्रवासी निवाऱ्यावर बारमालकाने बुलडोझर चालवून तो भुईसपाट केला. भिवापूर तालुक्‍यातील राष्ट्रीय महामार्गावरील गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त गाडेघाट-घाटउमरी या गावाच्या नागरिकांसाठी हा प्रवासी निवारा बांधण्यात आला होता. यासोबतच आसपासच्या परिसरातील मोठी झाडेही तोडण्यात आली.
नागपूर-भिवापूर राष्ट्रीय महामार्गावर तास कॉलनीच्या मागे गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील गाडेघाट व घाटउमरी या गावांचे पुनर्वसन झाले आहे. त्यांच्या सोयीसाठी महामार्गावर प्रवासी निवारा सरकारी निधीतून बांधण्यात आला होता. या मार्गापासून थोड्याच अंतरावर स्वप्निल पारवे यांच्या बिअरबारचे बांधकाम सुरू आहे. त्याच्या बांधकामासमोर प्रवासी निवारा असल्याने तो बारमालकाला अडचणीचा ठरत होता. बांधकाम सुरू करण्यापूर्वी हा प्रवासी निवारा सुस्थितीत होता. बांधकाम सुरू करताना प्रवासी निवाऱ्याचा मागील भाग जेसीबीने धडक देऊन पाडण्यात आला होता. आता बांधकाम पूर्णत्वास आल्यावर कुठलीही हालचाल नसल्याचे पाहून संपूर्ण प्रवासी निवारा बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आला. हा प्रकार दिवसा होऊनही ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले. सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समितीचे अधिकारी व तहसीलदार, पुनर्वसन विभागाला तर या घटनेचा मागमूसही नव्हता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com