मिहानवर मंदीचे सावट

मिहानवर मंदीचे सावट

नागपूर : विदर्भाच्या विकासाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिहान प्रकल्पाला पुन्हा आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. जागतिक आर्थिक मंदीमुळे मिहान सेझमधील निर्यातीच्या आकडेवारीत 20 टक्के घट झाल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे अनेक उद्योगांनी उत्पादन कमी केले असून येथील आयटी कंपन्यांच्या नवीन प्रकल्पाचे कामेही थंडबस्त्यात पडली आहे. 
2018-19 या कालावधीत मिहानमधून संपूर्ण वर्षात 1908 कोटींच्या उत्पादनाची निर्यात झाली होती. ती 2017-2018 च्या तुलनेत 70 टक्के अधिक होती. त्यामुळे उत्पादकांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. व्यवसाय दुप्पटीने वाढेल अशी अपेक्षा ठेवून कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची नेमणुक केली. मात्र, मागील सहा महिन्यांचे आकडे चिंता वाढविणारे आहे. या आकड्याने सर्वांची चिंता वाढवली आहे. त्यामुळे बैठका घेण्यात येत आहेत. केंद्र सरकारने पुढील पाच वर्षात अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनकडे नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अशीच अवस्था राहिल्यास ते लक्ष्य प्राप्त करणे अतिशय कठीण आहे, असे मिहान सेझचे विकास आयुक्त जयकरण सिंह यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कंपन्यांनी आपल्या अडचणी सोडवण्यासाठी बैठका घेण्यात येत आहेत. त्यांसोबत संवाद साधला जात आहे. व्यवसायातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे असेही त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com